जयंत पाटील म्हणाले, आबांना जाऊन अनेक वर्षे झाली, मात्र; आजही लोक त्यांची आठवण काढतात

jayant patil said This is an attempt to benefit the NCP family gadchiroli political news
jayant patil said This is an attempt to benefit the NCP family gadchiroli political news

अहेरी (जि. गडचिरोली) : राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस परिवाराशी हितगूज साधण्यासाठी केलेला आमचा हा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संवाद दौऱ्यात केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा सुरू करण्यात आला आहे. याची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून गुरुवारी करण्यात आली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवारांवर असलेल्या निस्सीम प्रेमामुळे पहिल्याच दिवशी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. सरकार आज आपल्या विचारांचे आहे म्हणून अधिकाधिक लोकांचे प्रश्‍न सोडवून पक्ष अधिक बळकट कसा करता येईल त्यावर आपण लक्ष द्यायला हवे, असेही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

बूथ कमिट्या तयार करण्याची त्यांनी सूचना केली. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मदतीने आपल्या गावाचा जास्तीत जास्त विकास कसा होईल, याचा विचार नवनिर्वाचित सदस्यांनी करावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा दौरा आखला असून आपल्या दौऱ्याच्या सुरुवातीसाठी विदर्भ निवडला याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार मानले.

जयंत पाटील यांच्या या भागाला भेट देण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्स्फूर्त वातावरण तयार होईल, अशी खात्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. शासनाने सर्वांत मोठी साडे बारा हजार पोलिस भरर्ती आणली आहे. त्याचप्रमाणे गडचिरोलीतही भरर्ती होणार आहे. तरुणींनी-तरुणांनी यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

आबांची आठवण

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापर्यंत तळागाळातील लोकांसाठीच काम केले आहे. स्वर्गीय आर. आर. पाटील (आबा) ज्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी इथल्या लोकांना आपला जास्त वेळ देत होते. आज आबांना जाऊन अनेक वर्षे झाली मात्र आजही इथले लोक त्यांची आठवण काढतात, याची आठवणही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना करून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com