Bears
BearsSakal

Yavatmal : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिरलं अस्वल! विद्यार्थी बाहेर अस्वल आत

यवतमाळ : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील एका शाळेच्या आवारात अस्वल घुसल्यामुळे एकच खळबळ उडाल्याची घटना घडली आहे. शाळेच्या परिसरात सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या अस्वलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अस्वलाने या परिसरामध्ये कहर केला आहे. आता हे अस्वल शाळेमध्ये शिरल्यामुळे अस्वल शाळेत आणि विद्यार्थी बाहेर अशी गंमतीशीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अस्वलाच्या शाळेत घुसण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून या अस्वलाने काही काळ चांगलाच धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली आहे.

Bears
Dhule Mock Drill : मॉक ड्रील मध्ये दहशवाद्याची अ‍ॅक्टिंग करणाऱ्याला नागरिकांनी खरा दहशतवादी समजून दिला चोप

घाटंजी तालुक्यातील येथील भीमकुंड गावातील शाळेमध्ये हा प्रकार घडला असून वनविभागाला या अस्वलाला पकडून नेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

मागच्या काही वर्षामध्ये जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये घुसण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. बिबट्या, गवा, अस्वल, नीलगाय असे जंगली प्राणी खाद्यासाठी किंवा अन्न पाण्याच्या तुटवडा निर्माण झाल्यावर मानवी वस्तीमध्ये घुसून धुडगूस घालत असतात. तर अशावेळी वनविभागाकडून सदर जंगली प्राण्याला पकडण्याची मोहीम हाती घेतली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com