
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर राष्ट्रवादीचे फायरब्रॉंड नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तोफ डागली. माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या निशान्यावर होते.
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर राष्ट्रवादीचे फायरब्रॉंड नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तोफ डागली. माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या निशान्यावर होते.
दुसऱ्या दिवशी सभागृहातील गोधंळानंतर दुपारी 12 वाजता दिवसभराचे कामकाज तहकुब करण्यात आले. यापूर्वीच विरोधकांनी सभागृहात बॅनर झळविले. याचवेळी आमदार आव्हाड सभागृहाबाहेर आले व भाजप अपरिपक्व असल्याचा आरोप केला. मंगळवार कामकाजाचा जेमतेम दुसरा दिवस आहे. सरकार नवीन आहे, देशाचा आणि जगाचा विवेक बघितल्यास नवीन सरकारला सहा ते आठ महिने काम करण्याची संधी दिली जाते.
ताजी बातमी - #NagpurWinterSession : सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : फडणवीस
परंतु, विरोधी पक्ष पहिल्या दिवशीपासूनच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करीत आहे. प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षांत भाजपप्रणीत फडणवीस सरकारने निकृष्ट कामगिरी केली आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. केवळ दोन दिवसात हे अपयश धुणे शक्य आहे का, असा प्रतिप्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केला.
केंद्रात मोदी सरकारने नागरिकक्त दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून देशात हाणामारीची स्थिती निर्माण केली आहे. दुसरीकडे राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपने हाणामारी करून ते सत्तेशिवाय राहू शकत नाही, हे दाखवून दिले आहे. या गॅंगवारच्या माध्यामातून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
सध्या विदर्भासह राज्यभारात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहे. फडणवीस सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. त्याची लाज बाळगण्याऐवजी विरोधी पक्षाची ही कृती निंदनीय आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.