Kalamb Bus Driver Assault : बस रस्त्याच्या कडेला उभी केली म्हणून चालकास मारहाण; कळंबमध्ये दिनेश राठोडविरुद्ध गुन्हा

Dispute Erupts on Devanala Pod Road : कळंब तालुक्यातील देवनाळा पोड मार्गावर बस रस्त्याच्या कडेला उभी केल्याच्या कारणावरून चालक सुभाष दरणे यांना मारहाण केल्याची घटना घडली.
Kalamb Bus Driver Assault

Kalamb Bus Driver Assault

esakal

Updated on: 

कळंब : बस रस्त्यात का उभी केली म्हणून एकाने चालकास मारहाण केली. शनिवारी (ता. २६) सकाळी १०:४५ वाजताचे दरम्यान देवनाळा पोड मार्गावर ही घटना घडली. चालक सुभाष गणपतराव दरणे (वय ४९) रा.पार्डी (सा) हे राळेगाव बस आगारात चालक या पदावर कार्यरत आहे.

शनिवारी ते मानव विकास मिशनची बस (क्र. एमएच ४०एक्यू ६०८५) घेऊन राळेगाव येथून जोडमोहाकडे जात होते. १०:४५ वाजता देवनळा पोड येथील प्रवासी घेऊन जात असताना समोरून देवनाळा येथील कार (क्र. एमएच ३२ एएच ६४२६) चा चालक दिनेश देवानंद राठोड हा रस्त्याच्या मधोमध गाडी चालवित हाता.

Kalamb Bus Driver Assault
UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

त्यामुळे बस चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या खताच्या ढिगाऱ्यावर बस उभी केली. दिनेश राठोडने वाद करून बस चालकाला शिविगाळ करून मारहाण केली. बस वाहक प्रिती कुबडे यांनी आगार प्रमुख व पोलिसांना फोन केला असता त्यांनाही धमकी दिली व त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला.

त्यानंतर आगार व्यवस्थापक पल्लवी नेहारे, सहाय्यक राजेंद्र कोवे व कळंब पोलिस हजर झाले. सायंकाळी सहा वाजता बस चालक सुभाष दरणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी दिनेश राठोडविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास ठाणेदार निळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com