कमलेश तिवारी हत्याकांडाचे नागपूर कनेक्शन, एका संशयितास उचलले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

नागपूर : हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्याकांडाचे तार नागपूरशी जुळले असून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपुरातून सैयद नावाच्या एका संशयित आरोपीला आज ताब्यात घेतले. अतिशय गुप्तपणे राबविलेल्या ऑपरेशनमध्ये हत्याकांडाच्या सूत्रधाराला अटक केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

नागपूर : हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्याकांडाचे तार नागपूरशी जुळले असून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपुरातून सैयद नावाच्या एका संशयित आरोपीला आज ताब्यात घेतले. अतिशय गुप्तपणे राबविलेल्या ऑपरेशनमध्ये हत्याकांडाच्या सूत्रधाराला अटक केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशचे हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडात आतापर्यंत गुजरात एटीएसने तिघांना अटक केली. तर महाराष्ट्र एटीएसने नागपुरातून एका संशयित आरोपीला अटक केली. कमलेश तिवारी हत्याकांडाचा सूत्रधार नागपूरचा असून त्याला एटीएसने ऑपरेशन राबवून ताब्यात घेतले. कमलेश तिवारी यांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड राशिद पठाण याने कमलेश यांची हत्या केल्यानंतर नागपुरातील सैयद नावाच्या एकाला फोन करून "काम फत्ते' झाल्याची माहिती दिली होती, त्याच आधारावर कमलेश हत्याकांडात नागपूर कनेक्‍शन समोर आले आहे. आज दुपारी महाराष्ट्र एटीएसने नागपुरातून संशयित असलेल्या सैयद नावाच्या एका व्यक्‍तीला ताब्यात घेतले. मात्र, नागपूर एटीएस याबाबत कोणतीही माहिती देण्यास तयार नाही. त्यामुळे एटीएसने नागपूर पथकाची मदत न घेता कारवाई केल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने 3 जणांना अटक केली. यात राशिद पठाण, मोहसीन पठाण आणि फिरोज पठाण यांचा समावेश आहे. या तिघांना सुरतच्या लिंबायतमधून पोलिसांनी अटक केली. त्यांची चौकशी सुरू असतानाच यातील एका आरोपीने घटना घडल्यानंतर नागपूर येथील एका व्यक्तीला कॉल केल्याचे आरोपीच्या मोबाईलमधील सीडीआरमधून उघडकीस आले. त्यानुसार महाराष्टाच्या दहशतवाद विरोधी पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. या घटनेचा मास्टरमाइंड राशिद पठाणने सैयद नावाच्या या व्यक्तीला माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. 
सीडीआरमधून उलगडले कनेक्‍शन 
राशिद पठाण याला एटीएसने अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यात आला. त्याने हत्याकांड घडविल्यानंतर काही मिनिटांतच नागपुरातील सैयदला फोन केला होता. सीडीआरमध्ये नागपूरचा मोबाईल क्रमांक मिळताच उत्तरप्रदेश एटीएसने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने नागपुरातील संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kamlesh tiwari murder, nagpur connection