
Fridge Compressor Explosion
sakal
कामठी : शहरातील हमालपुरा परिसरात शनिवारी सकाळी राठी हॉस्पिटलसमोर राहणाऱ्या गजभिये कुटुंबाच्या घरात फ्रिज कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट होऊन काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे परिसरात खळबळ उडाली. यात सुमारे दोन लाखांवर रुपयांचे साहित्य खाक झाल्याची माहिती आहे.