भरतपूरच्या धर्तीवर काटेपूर्णात पक्षी अभयारण्य

प्रवीण खेते
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

अकोला - जैवविविधता राखण्याच्या दृष्टिकोनातून काटेपूर्णा अभयारण्यात भरतपूरच्या धर्तीवर पक्षी अभयारण्य विकसित होत आहे. पक्षी संवर्धनाचे हे एक सकारात्मक पाऊल असून, त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

अकोला - जैवविविधता राखण्याच्या दृष्टिकोनातून काटेपूर्णा अभयारण्यात भरतपूरच्या धर्तीवर पक्षी अभयारण्य विकसित होत आहे. पक्षी संवर्धनाचे हे एक सकारात्मक पाऊल असून, त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

अकोला वन विभागांतर्गत येणारे काटेपूर्णा अभयारण्य हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. वन्यजीव प्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र असलेल्या या अभयारण्यात पक्षी संवर्धनाच्या दृष्टिकोनातून हा अभिनव उपक्रम अकोला वन विभागाने हाती घेतला आहे. राजस्थान येथील भरतपूर पक्षी अभयारण्याच्या (केवलादेव राष्ट्रीय उद्यान) धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. काटेपूर्णा अभयारण्याच्या वाघा परिक्षेत्रातील 1300 हेक्‍टरवर पसरलेल्या गाळ तळ्यात पक्षी संवर्धनाचा हा उपक्रम आहे. त्यामुळे येत्या काळात काटेपूर्णा अभयारण्याला पक्षी अभयारण्य म्हणून ओळख निर्माण होणार आहे. काटेपूर्णा अभयारण्य हे बिबट्या, नीलगाय, अस्वल, काळविट व इतर वन्य प्राण्यांमुळे निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. पक्षी अभयारण्यामुळे पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे.

तीन बेटांची निर्मिती
गाळ तळ्यात तीन बेटांची निर्मिती करण्यात आली आहे. या बेटांवर बांबूसह इतर झाडांची लागवड करण्यात आली आहे, जेणेकरून त्यावर विविध पक्षी आपली घरटी बांधून राहू शकतील. त्यामुळे या पक्ष्यांना घरट्याजवळच मासे सहज मिळतील. शिवाय, या ठिकाणी पाणकावळे, फ्लेमिंगो, स्वर्गीय नर्तक यांसारखे तब्बल 150 प्रजातींचे पक्षी वास्तव्यास आहेत.

काटेपूर्णा अभयारण्यात वाघा परिक्षेत्रात गाळ तळात पक्षी संवर्धनासाठी काम हाती घेण्यात आले आहे. हा उपक्रम भरतपूरच्या धर्तीवर राबविण्यात येत आहे. पर्यटन विकासाला चालना मिळवी यासाठी वन विभागातर्फे येथे बोटिंग आणि निवासाची देखील सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
- मनोजकुमार खैरनार, उपवन संरक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Katepurna bird Sanctuary