Kerala Man Found Dead Near Pandharkawda
esakal
पांढरकवडा : दिल्ली येथे रेस्टॉरंट चालविणार्या आणि मूळच्या केरळ राज्यातील असलेल्या एका 29 वर्षीय तरुणाचा पांढरकवडा जवळील धारणा शिवारात संशयास्पद मृत्यू झाला. गुरुवारी (ता. दोन) दुपारी साई सुमन पेट्रोल पंपाच्या बाजूला तो मृतावस्थेत आढळून आला. रोहित चंद्रन (रा. श्रीवराहम, जि. तिरुअनंतपुरम, केरळ) असे मृतकाचे नाव असून, तो आपल्या केएल 01 सीवाय 9641 क्रमांकाच्या कारने दिल्लीहून केरळला जात होता.