

Buldhana Accident
sakal
केळवद : मध्यप्रदेशातील सौंसर तालुक्यातील जामसावळी हनुमान मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या दोन भाविकांचा चारचाकीच्या धडकेत शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. डिकंल कचरू बोटरे (वय २२, रा.आजनी, ता.) सावनेर तसेच चंद्रशेखर श्यामराव नवदीपी (वय ४३, रा.दुधा, जि.पांढुर्णा, मध्य प्रदेश ) अशी या मृतांची नावे आहेत.