Khamgaon 3 AM Armed Robbery
esakal
खामगाव (जि. बुलढाणा) : खामगाव शहरातील वाडी परिसरातील वृंदावन नगर येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका घरात सशस्त्र दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली. या दरोड्यात चोरट्यांचा प्रतिकार करणाऱ्या पिता-पुत्रावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.