बाजार समिती सभापतींसह संचालकावर अपात्रतेची टांगती तलवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 December 2019

नागपूर उच्च न्‍यायालयाच्‍या या आदेशाने सत्‍ताधारी परिवर्तन पॅनलला मोठा धक्‍का बसला असून सभापतींसह त्‍यांच्‍या पॅनलमधील संचालकांवर टांगती तलवार आहे.

शेगाव (जिल्हा बुलडाणा) : बाजार सेस फंडाच्‍या रकमेत कृषी उत्‍पन्न बाजार समितीला 52 लाखाचे नुकसान  पोहचविने व इतर तकरारी  प्रकरणी कृषी उत्‍पन्न बाजार समितीचे सभापती गोविंद मिरगे व त्‍यांच्‍या सहभागी संचालकांना अपात्र करण्याचे करिता दाखल कलम 45 अंतर्गत तक्रारीवर कारवाई करण्यात यावी असे आदेश  उच्च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपिठाने आज दिले आहेत. न्‍यायालयाच्‍या या आदेशाने सत्‍ताधारी परिवर्तन पॅनलला मोठा धक्‍का बसला असून सभापतींसह त्‍यांच्‍या पॅनलमधील संचालकांवर टांगती तलवार आहे. 

शेगाव बाजार समिती सभापती गोविंद मिरगे व पॅनलचे संचालक यांच्‍या विरोधात शिवशंकर गिते यांनी जिल्‍हा उपनिबंधकाकडे तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये सभापती व सहकारी संचालकांनी नियमबाह्य ठराव घेवून बाजार सेस फंडात कृषी उत्‍पन्न बाजार समितीचे 52 लाखाचे नुकसान केले असल्‍याचा आरोप करण्यात आला होता. त्‍यानुसार  आज नागपूर उच्च न्‍यायालयाने त्‍यांच्‍यावर नियमानुसार कलम 45 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.या निर्णयामुळे परिवर्तन सहकार पॅनलच्‍या वतीने फटाके फोडून जल्‍लोष करण्यात आला. 

हेही वाचा - दुधात पडली महागाईची माशी

आज अविश्‍वास ठराव
गुरुवारी (ता.12) अविश्वास ठराव पारीत करण्यात येत असून त्‍याआधीच आलेल्‍या न्‍यायालयाच्‍या निर्णयाने परिवर्तन पॅनलच्‍या गोटात चिंतेचे तर सहकार पॅनलच्‍या गोटात आनंदाचे वातावरण आहे. संचालकांच्या मतांची आवश्यकता असून सहकार पॅनलच्या बाजूने तुर्तास 9 संचालक आहेत. त्यामूळे 3 संचालक आपल्या बाजूने  वळवून अविश्‍वास ठराव पारीत करण्यात परिवर्तन पॅनलचे नेते यशस्वी होतात का ?

उद्या कळेल
जिल्हा उपनिबंधक यानी अपात्र ठरविलेल्या बाजार समिति संचालक रुपाली अनंत बरडे यानी सुद्धा याचिका दाखल करून उच्च न्यायालयात अपात्रता आदेशयला आव्हान दिले परंतु त्यांना स्थगिती  मिळाल्याने  त्यांना आज होणाऱ्या सभेत मतदान करता येणार नसल्याने सहकार पैनलचे पारड जड झाल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khamgaon President disqualified