Bike Accident: खापावरून गावाकडे जाताना दुचाकी घसरली; दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू
Fatal Motorcycle Accident in Khapa: खापा-सिंदेवानी मार्गावर टेंभुरडोह फाट्याजवळ दुचाकी अपघातात विजय पांडुरंग मोहतकार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही; खापा पोलिस तपास करत आहेत आणि घटनास्थळावरून अधिक माहिती गोळा केली जात आहे.
खापा : खापा-सिंदेवानी मार्गावर टायगर रिसोर्टजवळील टेंभुरडोह फाट्याजवळ शुक्रवारी (ता.१४) सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात विजय पांडुरंग मोहतकार (वय ३६, रा. नागलवाडी, ता. सावनेर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.