

Police Officers Attacked in Nagpur: Two Cops Injured by Mentally Ill Accused
Sakal
खापरखेडा (जि.नागपूर) : स्थानिक पिपळा डाकबंगला परिसरात दुपारी घडलेल्या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. कौटुंबिक वाद झाल्याने ११२ वर आलेल्या तक्रारीवरून घटनास्थळी पोहोचलेल्या दोन पोलिस शिपायांवर एका मनोरुग्णाने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात दोन्ही पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.