
दुसरबीड,(बुलडाणा) : किनगावराजा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तढेगाव शिवारात अनोळखी इसमाचा मृत्यदेह आज २९ जून रोजी पहाटे ६ वाजता आढळून आला. यावरून किनगाव राजा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद घेतली. ओळख पटविण्याचे कार्य सुरू असतानाच जालना जिल्ह्यातील राजाटाकळी येथे २८ जून रोजी अपहरण झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली आणि मृतकाची ओळख पटली आहे.