धक्कादायक! मुलं होत नाही म्हणून विवाहितेसोबत घडला हा प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीर अहमद अ.बशीर यांच्या सायमा कौसर या मुलीचा विवाह मोहनपुऱ्यातील शे.मोहम्मद शे.युसूफ याच्याशी झाला होता.

मलकापूर (जि.बुलडाणा) : मुल बाळ होत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा गळा आवळून जिवे मारल्याची घटना येथील मोहनपुरा भागात शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीर अहमद अ.बशीर यांच्या सायमा कौसर या मुलीचा विवाह मोहनपुऱ्यातील शे.मोहम्मद शे.युसूफ याच्याशी झाला होता. सायमा कौसर हिला मुलबाळ होत नाही. या कारणामुळे तिचा बऱ्याच दिवसापासून शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. यामुळे ती खुप त्रस्त होती. याबाबत तिने अनेकदा माहेरी सांगितले सुध्दा होते.

हेही वाचा - जागतिक हास्य दिन : हसण्याचे आहेत हे फायदे; का साजरा करतात हास्य दिन?...वाचा

मात्र, काही दिवस उलटले की सर्व काही ठिक होईल अशी आशा माहेरच्यांना होती. परंतु तिचा त्रास वाढतच गेला. यातच अखेर 29 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सासरच्या मंडळीने सायमा कौसर हिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार जमीर अहमद शेख बशीर यांनी शहर पोलिसात दिली.

आवश्‍यक वाचा - बापरे! या धरणाला लागली गळती; भिंतीलाही गेले तडे...मग कारण बनतील खेकडे

पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करून मृतक सायरा कौसरचे पती शे.मोहम्मद शे.युसुफ, सासू जुलेखाबी शे.युसूफ, दिर शे.अमीन शे.युसूफ, दिराणी जमिलाबी शे.अमीन, मामसासरे शे.हमीद शे.अहमद अशा पाच जणांविरूध्द शुक्रवारी कलम 302, 498 अ, 323, 34 अन्वये भादविचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी उशिरा रात्री विवाहितेचा पती, सासू, दीर, दिराणी अशा चार जणांना अटक करून ताब्यात घेतले आहे. तर पाचवा आरोपी मामसासरा शे.हमीद शे.अहमद हा फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संजीवनी  पुंडगे यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kind of thing happened with married women because they don't have children