बापरे! या धरणाला लागली गळती; भिंतीलाही गेले तडे...मग कारण बनतील खेकडे

karadi dam in buldana district.jpeg
karadi dam in buldana district.jpeg

धाड (जि.बुलडाणा) : बुलडाणा तालुक्‍यातील धाड परिसरातील हजारो हेक्‍टर शेती सिंचनाखालील येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायम मिटविणाऱ्या करडी या महत्त्वपूर्ण धरणाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून, गेल्या पाच वर्षांपासून करडी धरणाची गलती थांबविण्यात आली नसून, संपूर्ण भिंतीवर झाडे मोठ्या प्रमाणात असून, अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेलेले आहे. या उन्हाळ्यामध्ये तरी धरणाची दुरुस्ती होऊन पाण्याची गळती थांबेल काय असा प्रश्‍न परिसरातील शेतकरी बांधवासह नागरिकांना पडत आहे.

परिसरातील अतिशय महत्त्वपूर्ण करडी धरण असून, संपूर्ण परिसरात सुजलाम्‌ सुफलाम्‌ करून नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मिटविणाऱ्या करडी धरणाची निमित्ती 1996- 97 मध्ये करण्यात आली. या धरणामुळे 2 हजार हेक्‍टर शेती ओलित झाली. तर धरणासाठी 219.36 हेक्‍टर जमीन संपादित करण्यात आली होती. यामध्ये पाणलोट क्षेत्र 74.32 चौरस मिटर असून, पातळी 96.40 एवढी आहे. जलसाठा 5.898 दशलक्ष घनमीटर आहे. या धरणाला 35 स्वयंचलित दरवाजे आहे. या महत्त्वपूर्ण धरणाकडे पाटबंधारे विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. 

धरणाचे 35 दरवाजांचे रबर पॅकिंग खराब झाले असता सकाळ ने सातत्याने लक्ष वेधून 15 लाख रुपयाचे अनुदान अमरावती विभाग तंत्र विभागाकडून सदर दरवाजांचे रबर पॅकिंग बसविण्यात आले होते. परिसरातील करडी, शेलापूर, मासरुळ येथील पद्‌मावती धरणाची दुरुस्ती व देखभाल गेल्या चार वर्षांपासून झालेले नाही. पाटबंधारे विभाग चिखली हे पूर्वी या धरणांची देखभाल करीत होते मात्र, चिखली येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय बंद करण्यात आले असून, संबंधित विभागाकडून पाटबंधारे विभाग बुलडाणा यांना सध्यास्थितीत हस्तांतरित करण्यात आलेले नाही. 

ही एक मोठी शेतकऱ्यांसाठी शोकांतिका म्हणावी लागेल. हस्तांतर न झाल्यामुळे करडी धरणाची देखभाल व दुरुस्ती ही करण्यात येत नाही. मागील वर्षा प्रथमच करडी धरण हे शंभर टक्के भरते. मात्र, धरणाच्या मध्यभागी भिंतीला खलून भगदाड पडून उकला लागला होता. या संदर्भात सकाळ 20 ऑगस्ट 2019 ला वृत्त प्रकाशित करताच शासनाने याबाबत दखल घेत धरणाच्या लिकेज व बोगदा पाहणीसाठी लोकप्रतिनिधीही भेट देऊन फोटो सेशन करून प्रसिद्ध मिळवून कोरडे आश्‍वासन त्यावेळी दिले होते. परिसरातील धाडसह करडी, चांडोळ, सातगाव बोरखेड, कुंबेफळ, सावली, टाकळी, डोमरुळसह अनेक गावांना येथून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. दुरुस्ती न झाल्या संबंधित गावांना पाणी मिळणे कठीण होईल. हस्तांतराच्या लढाईत व लोकप्रतिनधींसह शासनाच्या वेळ काढून धोरणामुळे परिसर पुन्हा भकास होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

मात्र, आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती नाही
परिसरातील सर्व ग्रामपंचायत सरपंचांनी वेळोवेळी करडी धरणाच्या लिकेज व दुरुस्तीबाबत मागणी करीत आहे. मात्र, आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती झाली नाही. धरणाला पडलेला बोगदा सुद्धा दुरुस्त झालेला नाही. त्यामुळे धरणातील लाखो क्‍यूसेस पाणी वाया जाते असून, पर्यायाने नागरिकांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळणे कठीण होईल.
- रिझवान सौदागर, सरपंच, धाड

लवकरच यावर कारवाई
करडी धरणाच्या गळती संदर्भात व दुरुस्तीसह देखभाल विषयी कार्यालयाच्यावतीने प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करण्यात याव्यात याबाबत सूचना मिळाल्या आहे. लवकरच यावर कारवाई करण्यात येईल.
- एम. बी. मिरकुटे, अभियंता, बुलडाणा.

लोकप्रतिनिधींना धरणाचा विसर
चिखली मतदार संघात येणाऱ्या धाड परिसरातील करडी धरणाच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासनाकडे दुरुस्तीची मागणी करणे गरजेचे आहे. या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळणार आहे परंतु, याकडे त्यांचेही दुर्लक्ष झाले असून, धरणाची अवस्था अधिकच बिकट होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com