

Drought-hit families from Kinhiraja are migrating early in search of sugarcane-cutting and other jobs.
esakal
भिमराव पवार
किन्हीराजा, : घराघरांत दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू असताना, किन्हीराजा परिसरातील अनेक कुटुंबांच्या वाट्याला मात्र गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. यंदाच्या दुष्काळसदृश परिस्थितीने शेतीचा हंगामच हिरावून घेतल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकरी ऊसतोडीच्या कामासाठी कर्नाटकासह महानगरांकडे रवाना होत आहेत. दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर सुरू होणारे स्थलांतर यंदा सणापूर्वीच सुरू झाले आहे.