

Gondia News
esakal
सडक अर्जुनी (जि. गोंदिया): तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोहमारा गावातून मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ तसेच चंद्रपूर-बालाघाट मार्ग जातो.
चौपदरी रस्ता झाल्यानंतर वाहतुकीचा वेग वाढला असला तरी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वेगमर्यादेचे पालन होत नसल्याने राष्ट्रीय महामार्गासह परिसरातील अन्य मार्गांवर अपघातांची मालिका सुरूच असून, वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे.