शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान: तहसीलदार पुष्पलता कुमरे

नंदकिशोर वैरागडे 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

कोरची तालुक्यात गाव तिथे शाळा गाव तिथे महाविद्यालय देऊन शासनाने शिक्षणाचे बाजारीकरण केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास करून देण्याची हमी देऊन आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी संस्थाचालकांची व शिक्षकांची चढावर सुरू असते.

कोरची - तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये शिक्षक आपली वेतनश्रेणी व शाळेला मिळणारा अनुदान वाचवण्यासाठी आपल्या शाळेचा जास्त निकाल लागावा म्हणून विद्यार्थ्यांना गैरमार्गाने कॉपी पुरवून संख्यात्मक जास्त निकाल लावण्याच्या धडपड करत असतात. पण वर्षभर मात्र विद्यार्थ्यांना पाहिजे तसा मार्गदर्शन व शिक्षण दिल्या जात नाही, अशी खंत कोरची येथे आदिवासी मूलनिवासी या कार्यक्रमात तालुक्यात जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत असताना तहसीलदार पुष्पलता कुंमरे यांनी व्यक्त केले.

यावेळी मंचकावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष शामलाजी मडावी, कोरची पंचायत समिती सभापती कचरीबाई काटेंगे, प्रेरणा ऊईके वन परीक्षेत्र अधिकारी, अनिल केरामी जि. प. सदस्य, मनोज अग्रवाल, रामसुराम काटेंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मडामी, प्रेमीलाताई काटेंगे, आदि मान्यवर उपस्थित होते.

कोरची तालुक्यात गाव तिथे शाळा गाव तिथे महाविद्यालय देऊन शासनाने शिक्षणाचे बाजारीकरण केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास करून देण्याची हमी देऊन आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी संस्थाचालकांची व शिक्षकांची चढावर सुरू असते. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी शिकला काय नाही शिकला काय याचं कुणालाही देणेघेणे नसते. त्याचवेळी पुढे बोलताना तहसीलदार कुमरे यांनी तालुक्यात चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी पुढे मार्च 2019 मध्ये होऊ घातलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी व दर्जेदार शिक्षण प्रणाली आणण्यासाठी आपण व्यक्तीशः कॉपीमुक्त तालुका निर्माण करून आदिवासी मुलंमुली चांगला अभ्यास करून पास व्हावे यासाठी प्रयत्न करू. यानंतर शिक्षकांनी व्यक्तिगत स्वार्थ सोडून सर्व शाळेच्या शिक्षकांनी चांगल्या पद्धतीचे विद्यार्थ्यांना शिकवावं. कॉपी पुरवण्यासाठी जीवाची पराकाष्टा करून प्रयत्न करतात. तेवढेच प्रयत्न नेहमीच शाळेत येऊन शिकवल्यास या परिसरातील विद्यार्थी चांगले घडले जातील. याठिकाणी संख्यात्मक निकाल लागत असला तरी तो काॅपीमुळे लागतो. त्यामुळे या तालुक्यातील विद्यार्थी बाहेरगावी जाऊन स्पर्धात्मक परिषद मागे पडतात. याला सर्वस्वी जबाबदार या परिसरातील दहावी-बारावीचे शिक्षक हेच आहेत. त्यामुळे आदिवासीचे मुलीच शिकूनही काही उपयोग होत नाही. आपले धंदे चालवण्यासाठी संस्था संस्थापक शिक्षक आदिवासी मुलांना वेठीस धरू नये व त्यांच्या जीवनाचा व्यक्तिगत स्वार्थासाठी नाश करू नये, अशा त्या म्हणत होत्या. 

याला कार्यक्रम स्थळी उपस्थित आदिवासींनी आदिवासींनी खूप प्रतिसाद दिला. तर स्पर्धा परीक्षा कविता मार्गदर्शनासाठी वर्ग उपलब्ध करून त्यासाठी लागणारे पुस्तक आम्ही अधिकारी लोक पुरवठा करू व स्पर्धा परीक्षेचे तयारी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही तहसीलदार कुमरे यांनी दिली. त्यामुळे या क्रांतिदिनी शिक्षणाची क्रांती पुढील सत्रात घडेल, अशी आशा करायला काही हरकत नाही.

त्यामुळे 2019 मध्ये होऊ घातलेल्या दहावी व बारावीचा परीक्षेकडे तहसीलदार नेमकी काय भूमिका घेतात की अजुन तोच काफिया यांच्या गोरख धंदा सुरू राहणार याकडे कोरची वासियांचे लक्ष लागले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of development of education the tribal students numbers are decrease says Tehsildar Puspalata Kumre