esakal | महिला, त्याही लुटारू! छे, विश्‍वासच बसणार नाही! 
sakal

बोलून बातमी शोधा

Autoriksha

ऑटोरिक्‍क्षाची वाट पहात त्या रस्त्यावर उभ्या असताना (एमएच 26 टी 6988) क्रमांकाचा ऑटोरिक्‍क्षा त्यांच्याजवळ आला. त्यावेळी आधीपासूनच रंजिता आणि कुमा या ऑटोत बसल्या होत्या. नुरी कॉलनीकडे जात असताना इंदोरा मैदानाजवळ ऑटोत बसलेल्या एका महिलेने ओकारी येत असल्याचा बहाणा केला.

महिला, त्याही लुटारू! छे, विश्‍वासच बसणार नाही! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या "ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंबर पात्रे (वय 30) आणि ऑटोचालक शेख फिरोज शेख बशीर (तिघेही रा. आनंदनगर, वर्धा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी नुरी कॉलनी येथे राहणाऱ्या फिरोजा बेगम इकबाल खान (वय 56) या मोमीनपुरा येथील दवाखान्यात उपचारासाठी गेल्या होत्या. उपचार करून त्या ऑटोने इंदोरा चौकात आल्या. चंभारनाला येथील इंदोर नमकिनजवळील औषधीच्या दुकानातून औषधी घेऊन त्या बाहेर पडल्या. ऑटोरिक्‍क्षाची वाट पहात त्या रस्त्यावर उभ्या असताना (एमएच 26 टी 6988) क्रमांकाचा ऑटोरिक्‍क्षा त्यांच्याजवळ आला. त्यावेळी आधीपासूनच रंजिता आणि कुमा या ऑटोत बसल्या होत्या. नुरी कॉलनीकडे जात असताना इंदोरा मैदानाजवळ ऑटोत बसलेल्या एका महिलेने ओकारी येत असल्याचा बहाणा केला. त्यामुळे ऑटोचालकाने ऑटो थांबवून फिरोजा बेगम यांना ऑटोतून उतरविले आणि ऑटोचालक तेथून निघून गेला. काही वेळानंतर फिरोजा बेगम यांना त्यांची 80 हजार रुपयांची दोन तोळ्याची सोनसाखळी चोरीला गेल्याचे लक्षात आले. लगेच त्यांनी जरीपटका पोलिस ठाणे गाठून पोलिसात तक्रार केली. 

अवश्य वाचा- दोघेही पेशाने प्राध्यापक अन्‌ सार्वजनिक ठिकाणी केले अशोभनीय कृत्य... 

सावजाच्या शोधात असताना ते अडकले जाळ्यात

सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास तीनही आरोपी जरीपटका येथील सीएमपीडीआय रोडवरील बजाज कॉलेजजवळ सावजाच्या शोधात होते. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी गेले. पोलिसांना पाहून तिघांनीही ऑटोतून पळ काढला. परंतु, पोलिसांनी त्या तिघांनाही पकडले. पोलिस ठाण्यात आणून त्यांची सखोल चौकशी केली असता तीन दिवसांपूर्वी ऑटोतून प्रवास करणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी लंपास केली होती, अशी कबुली रंजिताने दिली. पोलिसांनी तिची पर्स तपासली असता तिच्याजवळ चोरीला गेलेली सोनसाखळी मिळून आली. पोलिसांनी ऑटोरिक्‍क्षा आणि सोनसाखळी असा 1 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 


 

loading image