esakal | प्रियकरासह शेतमालकांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

प्रियकरासह शेतमालकांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वरोरा : प्रियकरासोबत पळून जाताना शेतातील कुंपणात असलेल्या वीजतारांचा स्पर्शाने प्रेयसीचा मृत्यू झाल्याची घटना मजरा (रै) शिवारात घडली. याप्रकरणी प्रियकरासह दोन शेतमालकांना पोलिसांनी अटक केली.
खैरगाव येथील कोमल गराटे ही वरोऱ्यातील एका महाविद्यालयात प्रथम वर्गाला शिकत होती. खैरगाव येथील तिच्या मामाकडे निंबाळा येथील हेमंत बाळकृष्ण दडमल नेहमी येत होता. दोघांत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. एक सप्टेंबर रोजी रात्री दोघेही खैरगाव येथील शेतशिवारातून पळून जात होते. शेतातील कुंपणाला विद्युत प्रवाह असल्याने दोघांनाही शॉक लागला. त्यात कोमल गराटे हिचा मृत्यू झाला. रात्र हेमंतने तिथेच काढली. सकाळी वरोरा पोलिस स्टेशन गाठून माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी गाठून चौकशी केली. काटेरी कुंपणात वीजप्रवाह सोडण्यात आल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले. प्रवाह सोडण्यात आलेल्या वीजतारा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. याप्रकरणी हेमंत दडमल, शेतमालक सुरेश रामचंद्र गेडाम, विठ्ठल रामचंद्र गेडाम यांना अटक केली.

loading image
go to top