पीकविम्याची वाढीव मुदत औटघटकेची

मनीष जामदळ
शुक्रवार, 26 जुलै 2019

यवतमाळ : विदर्भात पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने सोयाबीन पूर्णत: हातून गेले आहे. परिणामी कपाशीचे उत्पन्न घटणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार हे निश्‍चित असल्याने पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यातच ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी, संथ संकेतस्थळ लक्षात घेता राज्य शासनाने पीकविमा भरण्यासाठी 29 जुलैपर्यंत वाढविलेली मुदत अपुरी ठरणार आहे.

खरिपातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना जाहीर करण्यात आली. या योजनेत सहभागी होण्यासाठी 24 जुलैपर्यंत अर्ज दाखल करावयाचे होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी सीएससी केंद्राकडे धाव घेतली होती. शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केल्याने संकेतस्थळ संथ झाले. ऑनलाइन सेवा ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळाला नाही. परिणामी ऑनलाइन अर्जही दाखल करता आला नाही. याचा फटका राज्यभरातील शेतकऱ्यांना बसला आहे. हा अनुभव लक्षात घेता दरवर्षी अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाते. सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्यात 80 टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. यावर्षी पावसाच्या विश्रांतीमुळे नुकसान होत आहे. नियमित कर्जदारांचा पीकविमा संबंधित बॅंक भरत असली तरी बिगरकर्जदार, थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. असंख्य शेतकऱ्यांचे सातबारा काढणे शिल्लक आहेत. 29 जुलैपर्यंत अर्ज भरणे शक्‍य नाही. त्यामुळे मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

शेतकऱ्यांकडून पीकविमा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीची मागणी झाल्यास तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल.
- नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी अधीक्षक, यवतमाळ.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: last date for crop loan application extended