Latur: लातूरकरांना पुन्हा उन्हाचे चटके; तापमान ३८ अंशांवर; औराद शहाजनी चाळिशीच्या उंबरठ्यावर

Rising Temperatures Trouble Latur Residents: लातूर जिल्ह्यात तापमान पुन्हा ३८ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, वाढत्या तापमानामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
Latur

Latur

esakal

Updated on

लातूर: पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या लातूरकरांना सध्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. शहरातील तापमान कधी ३७ तर कधी ३८ अंशांवर आणि औराद शहाजनीचे तापमान चाळिशीच्या उंबरठ्यावर पोचले आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेने लातूरकर त्रस्त झाले आहेत. पावसापासून संरक्षण घेण्याच्या महिन्यात हवामान बदलांमुळे उन्हापासून संरक्षण घेण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com