पश्‍चिम बंगालचे नेतृत्व मानसिक धक्‍क्‍यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

नागपूर : पश्‍चिम बंगालमध्ये नेमके काय सुरू आहे? निवडणूक युद्ध नव्हे, तर स्पर्धा असते. नागरिकांनी मतांचा कौल दिल्यानंतर ही स्पर्धा संपुष्टात येते. निवडणुकीनंतर सर्वच भेदभाव विसरून राष्ट्रकार्याला लागावे लागते. मात्र, सध्याच्या स्थितीकडे बघता पश्‍चिम बंगालच्या राजकीय नेतृत्वाला पराजय सहन झालेला नसून, त्यांना मानसिक धक्‍का बसला असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्‍त केले.
पश्‍चिम बंगालमध्ये दुसऱ्या राज्यातून गुंडे आले, असे बोलणे योग्य नसल्याचेदेखील सरसंघचालक म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीयवर्ष संघशिक्षा प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात झाला. या वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. या वेळी मंचावर नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, प्रशिक्षण वर्गाचे सर्वाधिकारी प्रा. अनिरुद्ध देशपांडे व विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गातील स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना डॉ. मोहन भागवत यांनी पश्‍चिम बंगालमधील सध्याच्या राजकीय स्थितीचा समाचार घेतला. सरकार आणि न्यायव्यवस्थेने पुढाकार घेऊन तेथील परिस्थिती नियंत्रणाखाली आणावी, असे ते म्हणाले.
भारताचा विकास होऊ नये यासाठी जगातील अनेक राष्ट्रे प्रयत्नात आहेत. देश प्रगती करीत असताना हिंसाचाराचे ग्रहण योग्य नसल्याचे सरसंघचालक म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संविधान सभेच्या भाषणात असाच इशारा दिला होता याची आठवण त्यांनी करून दिली. या वेळी शिबिरात सहभागी स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रशिक्षण वर्गाचे सर्वाधिकारी प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The leadership of West Bengal is a mental shock