‘फुले हसली, पाने कोमेजली’; आंब्याच्या पानांच्या नशिबात फुलांसारखी झळाळी नाही

Leaf rot on market streets in Amravati
Leaf rot on market streets in Amravati

मांजरखेड (जि. अमरावती) : काल आसमंतात सर्वत्र रोषणाई झळकत असताना बाजारात नवचैतन्य निर्माण झाले होते. दोन दिवसांपासून फुलांचे भाव वधारले होते. अडीचशे रुपये भाव असलेल्या फुलांनी शेवटपर्यंत आपले सौंदर्य कायम राखत लक्ष्मीपूजनापर्यंत बाजारातून सर्व फुले विकले गेली. मात्र, त्यांचे सहकारी असलेले आंब्याच्या पानांच्या नशिबात फुलांसारखी झळाळी मिळाली नाही. रात्रीच्या वेळेस बाजारपेठेतील रस्त्यावर पानांचा सर्वत्र सडा पडलेला दिसत होता. फुले हसली, पाने कोमेजली हाच अनुभव येत होता.

लक्ष्मीपूजनानंतर बाजाराचा फेरफटका मारला असताना काही दुकानांमध्ये उशिरा रात्री परिवारासह पूजन सुरू होते. शिवाय फटाके, फळे व निवडक दुकाने वगळता बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद झालेली होती. मात्र, मद्याच्या दुकानापुढे मद्यप्रेमींची गर्दी कायम होती. रेल्वेपुलावर नेहमीप्रमाणे बेघर व्यक्तींनी आपले बस्तान मांडलेले होते.

देशभरात अनेक जातीधर्म असताना दिवाळीच्या उत्सवादरम्यान राष्ट्रीय एकतेचा प्रत्यय पहायला मिळत होता. आसमंतात फटाक्यांची आतषबाजी होत असताना साबनपुरा मोहल्यातील जामा मशिद गेट समोर बालगोपाल अनार व अन्य फटाक्यांच्या आतषबाजीत मग्न होते.

बालकदिनाच्या औचित्य साधून आलेल्या दिवाळीच्या दिवशीचे हे दृश्य बघून दिवाळी आपली सर्वांची हा प्रत्यय येत होता. त्यांच्याच थोडे पुढे जवाहर रोडवरील दुकानासमोर एक महिला कचरा वेचून आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करीत होती.

कुठे सडा तर कुठे स्वच्छता

अमरावतीच्या बाजारपेठेत दिवाळीच्या दिवशी शेतातून व जंगलातून आणलेल्या आंब्यांची पानांची व झेंडूच्या फुलांची अनेक दुकाने लागलेली होती. रात्रीच्या वेळेस कॉटन मार्केट, अंबा देवी, डेपो समोर हिरव्या पानांचा सडा पडलेला असताना सर्वत्र अस्वच्छता पसरलेली होती. परंतु, पंचवटी व शेगाव नाक्यादरम्यान दुकानाच्या जागेवर कुठे लक्ष्मीची मूर्ती तर कुठे लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर पूजा-अर्चना केलेली दिसत होती. पंचवटी ते शेगाव नाक्यादरम्यान स्वच्छता आढळून आली. फक्त ऐन पंचवटी चौकात एका ठिकाणी झेंडूच्या फुलांची मोठी आरास दिसून आली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com