छंद म्हणून जुळ्या बहिणी करायच्या बेकरी प्रॉडक्ट्स तयार; आयुष्याने यु-टर्न घेतल्याने झाली व्यवसायाला सुरुवात

मंगेश गोमासे
Sunday, 15 November 2020

छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करून आलेल्या ऑर्डरनुसार केक, कुकीज आणि बरेच प्रॉडक्टस तयार करून देण्यास सुरुवात झाली. छोटे-छोटे कुकिंग क्लासेस करीत नवनवे पदार्थ तयार केले. यानंतर काही मोजके पदार्थ कसे तयार करायचे यासाठी बंगरुळ येथून विशेष प्रशिक्षण घेतले.

नागपूर : लहान वयात एखादे स्टार्टअप उभे करून त्यातून कमाई करणे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. इशिता आणि सान्या चड्डा असे या जुळ्या बहिणींनी अशीच भन्नाट संकल्पना वापरून वयाच्या अकराव्या वर्षापासून स्टार्टअप करून अनेकांना आर्श्चयाचा धक्का दिला आहे.

कुकिंगमध्ये आवड असल्याने वयाच्या आठ वर्षीच इशिता आणि सान्या चढ्ढा यांनी स्वयंपाक शिकून घेतला. केवळ छंद म्हणून इशिता आणि सान्या या विविध बेकरी प्रॉडक्ट्स तयार करायच्या. मात्र, कधी याचा व्यवसाय करून त्यातून पैसे कमाविता येईल असे कधीही त्यांच्या ध्यानीमनी आले नाही. मात्र, आयुष्याने यु-टर्न घेतला.

अधिक माहितीसाठी - खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

रामनगर येथील फूड पार्क येथील ‘एक्झीबिशन’मध्ये इशिता आणि सान्याने स्टॉल लावून आपले बेकरी प्रॉडक्ट्स विकायला ठेवले. या स्टॉल्समध्ये ठेवलेल्या विविध प्रॉडक्ट्सची चव भन्नाट असल्याने सर्वांनी त्यांचे कौतुकही केले. तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात स्टॉल लावण्यास सुरुवात केली.

त्यांच्या बेकरी, केक आणि बेक फूड या खाद्यपदार्थ्यांना बरीच मागणी वाढली. यातूनच बेकरी प्रॉडक्ट्स विक्री करण्याचा व्यवसाय करून त्यातून बऱ्यापैकी ‘अर्निंग’ मिळविता येईल असा एक विचार मनात डोकावला.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करून आलेल्या ऑर्डरनुसार केक, कुकीज आणि बरेच प्रॉडक्टस तयार करून देण्यास सुरुवात झाली. छोटे-छोटे कुकिंग क्लासेस करीत नवनवे पदार्थ तयार केले. यानंतर काही मोजके पदार्थ कसे तयार करायचे यासाठी बंगरुळ येथून विशेष प्रशिक्षण घेतले. पुढे या वाटचालीतून त्यांनी स्वतःचा ब्रॅण्ड विकसित करीत, व्यवसायाला सुरुवात केली.

आज त्यांनी तयार केलेल्या प्रॉडक्ट्सला ऑनलाईन बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काही विशेष पदार्थ त्यांची ओळख बनली आहे. हे पदार्थ नागपुरात केवळ इशिता आणि सान्याच तयार करू शकतात. नागरिक ऑर्डर नोंदवित आवडीने खाद्यपदार्थ मागवितात. यासाठी त्यांना आई संध्या आणि वडील डॉ. विशाल चड्डा यांची मोठी मदत झाली.

अधिक वाचा - सायंकाळी ५.३९ ते ८.३० या वेळेत करा लक्ष्मीपूजन; सर्वोत्तम मुहूर्त

अभ्यासातही टॉप

कुकिंग करीत असताना इशिता आणि सान्या चढ्ढा यांनी आपल्या अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. व्यवसायाप्रमाणेच आपल्या अभ्यासात त्यांनी नेहमी टॉप केले. सेंटर पॉईट शाळेत शिकताना व्यवसाय आणि शिक्षणाचा समतोल साधत दहावीच्या निकालात इशिताने ९७.८ टक्के तर सान्याने ९७ टक्के मिळवीत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh year twin sisters start business in Nagpur