
बुलडाणा : सध्या कोरोना विषाणुची जगभरात धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या भीतीपोटी देशातील पोल्ट्री उद्योग पूर्णपणे रसातळाला गेला आहे. राज्यासह जिल्ह्यात कुक्कुट पालन करणारे शेतकरी संकटात सापडले आहे. या संकटकाळी शासनाने पोल्ट्रीधारकांना अनुदान स्वरूपात मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सध्या जगभरात कोरोना विषाणुने दहशत निर्माण केली आहे. दरम्यान देशात आणि राज्यात कोरोनाची प्रचंड धास्ती वाढली आहे. कोरोनाच्या धाकाने नागरिकांनी चिकनकडे पाठफिरविली आहे. वास्तविक चिकनचा आणि कोरोनाचा कोणताही संबंध नसतानाही केवळ अफवेमुळे देशभरातील पोल्ट्री उद्योग धोक्यात आला आहे. कुक्कुटपालन व्यवसाय करणारे सर्व शेतकरी आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी पोल्ट्री उद्योग शेतात सुरू केला आहे. कुक्कुट पालन व्यवसायात साधारणत: प्रतिकिलो उत्पादन तयार करण्यासाठी किमान 70 रुपयांहून अधिक खर्च येतो आणि सध्या कोंबड्या फुकट घेऊन जा, अशी परिस्थिती पोल्ट्री धारकांची झाली आहे.
महत्त्वाची बातमी - अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व ‘विक’
पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात मदत करावी
त्यामुळे पोल्ट्री उद्योग पुरता रसातळाला गेला आहे. ज्याप्रमाणे एखादी आपत्ती येते त्यावेळी बाधीतांना सरकारद्वारे मदत केली जाते. त्याच धर्तीवर पोल्ट्री व्यवसायावर आलेली ही आपत्ती पाहता शासनाने पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात आर्थिक मदत करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शिवाय ट्वीट करूनही त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातील मागणी केली आहे.पोल्ट्री व्यावसायिकांना सरकारने मदत न केल्यास राज्यभर कोंबड्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोडू असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.