शिक्षिकेची नोकरी सोडून "ती' बनली बिल्डर 

सुषमा सावरकर
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

नागपूरला स्थायिक झाल्यानंतर जवळपास एक वर्षे रिता यांनी स्वतः चे शिवणकाम शिकवणी वर्ग चालविले. मात्र, त्यांच मन सतत काहीतरी वेगळं करु इच्छित होते. बांधकाम व्यावसायिकाचा व्यवसाय सुरु केला. हे वास्तव आजही अनेक लोकांच्या पचनी पडत नाही. मात्र, नंतर मग माझं काम बघितल्यावर तीचं लोकं कौतुकाची पाठ थोपाटत असल्याचं रिता पोटपोसे सांगतात.

नागपूर : व्यवसाय करण्यास अनेक गोष्टी पडताळत असताना बांधकाम व्यावसाय क्षेत्रात कार्य करावे असे वाटले. 2008 मध्ये या व्यवसायाला सुरवात केली. प्रारंभी पैसे, जागा मिळविण्याकरिता व फ्लॅट स्कीम पूर्ण करण्यास अनेक अडचणी आल्यात. मात्र, त्या आव्हान म्हणुनच स्विकारल्या. अनेक अडथळे पार करीत व स्वतः च्या कार्यावर ठाम विश्‍वास ठेवत रिता पोटपोसे यांनी शेफाली कन्सट्रक्‍शन बिल्डर्स अंतर्गत सहा फ्लॅटस स्कीम्स उभ्या केल्या आहेत.
रिता भास्कर पोटपोसे मुळच्या नागपुरच्या. त्यांनी बी.एस.सी, आर्कीटेक्‍ट, एमबीए अशा विविध पदव्या मळविल्या आहे. 1991 मध्ये लग्न झाल्यानंतर पतीच्या नोकरी निमीत्त त्यांना विविध गावांमध्ये तसेच शहरांमध्ये राहावं लागलं. यादरम्यान त्यांनी शिक्षिकेची नौकरी केली. मात्र कृतीशिल असलेल्या रिता यांना चाकोरीबध्द नोकरी फार रुचली नाही. 2007 मध्ये पती भास्कर पोटपोसे यांची बदली नागपूरला झाली. नागपूरला स्थायिक झाल्यानंतर जवळपास एक वर्षे रिता यांनी स्वतः चे शिवणकाम शिकवणी वर्ग चालविले. मात्र, त्यांच मन सतत काहीतरी वेगळं करु इच्छित होते. बांधकाम व्यावसायिकाचा व्यवसाय सुरु केला. हे वास्तव आजही अनेक लोकांच्या पचनी पडत नाही. मात्र, नंतर मग माझं काम बघितल्यावर तीचं लोकं कौतुकाची पाठ थोपाटत असल्याचं त्या सांगतात.
आजही फ्लॅट उभा करण्यास प्लॉट शोधणे, ठेकेदारांसोबत बोलणे, डिझाईन निवडणे, ग्राहकांशी समन्वय साधुन फ्लॅटस विकणे, रजिस्ट्री लावणे, यासारखी अनेक कार्य त्या स्वतः सक्षमपणे सांभाळतात. यामध्ये त्यांना त्यांचे पती व मुलगी शैफाली यांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे त्या आवर्जुन सांगतात. तसेच, घरातील ज्येष्ठ महीला मंडळींचीच नावे त्यांनी आतापर्यंत आपल्या फ्लॅट, इमारतींना दिलेली आहे. 'हे काम तुला जमणार नाही' असे शब्द कानावर पडताच, तेच काम हाती घेऊन अगदी उत्तमरित्या पार पाडून दाखवणे, हाच एक ध्यास रिता यांच्या मनात असतो. मुख्य म्हणजे, पुरुषांचा वावर असलेल्या बांधकाम क्षेत्रात त्यांनी स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. 

महिलांनी बिचारी किंवा अबला म्हणुन न जगता सक्षमपणे सर्वच क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण करायला हवा. ज्या महीला आत्मविश्‍वासाने, स्वकर्तृत्वाने पुढे येऊन बांधकाम व्यवसाय करु इच्छितात, त्यांना मदत करण्यास मी नेहमी तयार आहे. 
- रिता पोटपोसे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leaving her job as a teacher, she became a builder