
आता खऱ्या अर्थाने सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर गावातील राजकीय चेहरा समोर येणार आहे. प्रथम टप्प्यात दोन फेब्रुवारीला २६२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सोडती काढल्या जातील. संबंधित तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोडतीची प्रक्रिया होणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
इच्छुकांनी देव घातले पाण्यात; २६१ सरपंचासाठी सोडत, उत्सुकता शिगेला
अमरावती : ग्रामीण भागात राजकीय धुराळा उडवून देणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मंगळवारी (ता. दोन) पार पडणार आहे. जिल्ह्यातील एकूण ५३७ पैकी प्रथम टप्प्यात २६१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. सरपंचपद आपल्याकडे राहिले पाहिजे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहे. सरपंचपद कुणासाठी राखीव निघणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. मतदानानंतर निवडून आलेल्या सदस्यांमध्येच सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बाजी मारल्याचा दावा केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आता खऱ्या अर्थाने सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर गावातील राजकीय चेहरा समोर येणार आहे. प्रथम टप्प्यात दोन फेब्रुवारीला २६२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सोडती काढल्या जातील. संबंधित तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोडतीची प्रक्रिया होणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
याठिकाणी होणार सोडती
तालुका | ग्रामपंचायतींची संख्या |
अमरावती | ४४ |
तिवसा | २८ |
चांदूररेल्वे | २८ |
मोर्शी | ३७ |
दर्यापूर | ५० |
चांदूरबाजार | ४० |
धारणी | ३४ |
एकूण | २६१ |
सरपंचपदासाठी लॉबिंग सुरू
अनेक ग्रामपंचायतींमध्ये काट्याच्या लढती झालेल्या असल्याने दोन्ही पॅनेलमधील इच्छुकांनी सरपंचपदासाठी लॉबिंग सुरू केली आहे. आरक्षणानंतर जोडतोडीच्या राजकारणाला वेग येणार आहे. त्यामुळे चुरस आणखी वाढणार आहे.
Web Title: Leaving Today 261 Sarpanch Amravati District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..