Amravati News : अमरावती बाजार समितीच्या १६ सदस्यांची होणार चौकशी; न्यायालयाचा चौकशीला स्थगिती देण्यास नकार
High Court : न्यायालयाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १६ सदस्यांविरुद्धच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर १८ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांनी नोटीस बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे.
नागपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावतीच्या (एपीएमसी) १६ सदस्यांना त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करीत आव्हान दिले.