
या भागातील शेतकऱ्यांना सतर्क राहून बिबट्या आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ वनविभागाला द्यावी असे आव्हान देखील करण्यात येत आहे. विंचुरी तळेगाव ठाकूर हा भाग जंगल परिसराचा असला तरी याआधी जनावरांच्या शिकारी झाल्याच्या घटना फार कमी घडल्या आहेत.
तिवसा (जि. अमरावती) : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याने शेतकऱ्यांच्या जनावराची शिकार करीत नुकसान केले. त्यामुळे परिसरात असणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. यासाठी काल रात्री तिवसा वन विभागाची चमू माळेगाव व तळेगाव ठाकूर या जंगल भागात गस्त घालून बिबट्याचा घेत आहे.
तालुक्यातील तळेगाव ठाकूर मोजा विंचुरी, मालेगाव व शिवणगाव फत्तेपूर या भागातील जनावरे बिबट्याने खाल्ली असून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. ४८ तासातील तिसरी शिकार या बिबट्याने केली असल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने कंबर कसली असून, रात्रीच्या वेळी जंगल परिसरात शासकीय वाहनाने एका पथकाद्वारे बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.
या भागातील शेतकऱ्यांना सतर्क राहून बिबट्या आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ वनविभागाला द्यावी असे आव्हान देखील करण्यात येत आहे. विंचुरी तळेगाव ठाकूर हा भाग जंगल परिसराचा असला तरी याआधी जनावरांच्या शिकारी झाल्याच्या घटना फार कमी घडल्या आहेत. मात्र, ४८ तासांतच तीन जनावरांची शिकार झाल्याने हा बिबट आहे की वाघ अशी चर्चा या भागातील शेतकऱ्यांमध्ये आहे.
वनविभागाकडून बिबट्याची शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. जंगल भागात दिवस व रात्र गस्त घातली जात आहे. ४८ तासात तीन जनावरांच्या शिकार या बिबट्याने केल्याने पुढे कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी वनविभागाकडून दोन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहे. या कॅमेराद्वारे वन विभागाला बिबट्याची माहिती होईल.
क्लिक करा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी
सावधगिरी बाळगा
या भागात पथक नेमून रात्रीला गस्त घातली जात आहे. तसेच दोन ट्रॅप कॅमेरेसुद्धा लावण्यात आले आहेत. शिकार झालेल्या जागी कुठेही पगमार्ग दिसून आले नाही. शेतकऱ्यांनी रात्रीला एकट शेतीच्या कामाला जाऊ नये व सावधगिरी बाळगावी.
- आंनद सुरत्ने,
वनपरिक्षेत्रअधिकारी मोर्शी/तिवसा.
संपादन - नीलेश डाखोरे