
चांदूररेल्वे : अमरावती शहरालगत असणाऱ्या चिरोडी जंगलातील चिरोडी ते कारला मार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून सात ते आठ महिन्यांचा बिबट्याचा शावक ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. सहा) रात्री घडली. शनिवारी (ता. सात) पहाटे या घटनेसंदर्भात माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.