वाघाची दहशत काही संपेना : दोघांचा मृत्यू तर एका घटनेत बिवच्याचा ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघाची दहशत काही संपेना : हल्ल्यात देघांचा मृत्यू तर एका घटनेत बिबट ठार

वाघाची दहशत काही संपेना : हल्ल्यात देघांचा मृत्यू तर एका घटनेत बिबट ठार

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : गाईच्या वासराला बिबट्याने (leopard) मारल्यानंतर आरोपी बापलेकाने विषारी थिमेट औषध गोठ्यात मांडून ठेवले. हे विष खाल्ल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना फुलेनगर येथे घडली. वनविभागाने सुकलदास सेबूजी तोरणकर (वय ६५) व संदीप सुकलदास तोरणकर (वय २७, दोघेही रा. फुलेनगर) यांना अटक केली आहे. (Leopard dies of poisoning in Gondia district)

सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र सिंदीपार बिटअंतर्गत फुलेनगरजवळ एक बिबट्या मृतावस्थेत सोमवारी (ता. १०) आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. यात आरोपी सुकलदास तोरणकर याच्या गाईचा वासरू रविवारी बिबट्याने मारला होता.

हेही वाचा: याला म्हणतात माणुसकी! कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास उपचाराची रक्‍कम परत

त्यामुळे सुकलदास व त्याचा मुलगा संदीप यांनी दुसऱ्या दिवशी सोमवारी थिमेटनामक विषारी औषध गोठ्यात मांडले. हे विष खाल्ल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर वनविभागाने गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी राजेश पाचभाई करीत आहेत.

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

मूल (जि. चंद्रपूर) : शेतशिवारात गेलेल्या जानाळा येथील शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नॉन बफर क्षेत्रातील चिरोली बिटात घडली. कीर्ती रामदेवराव कुळमेथे (वय २५) असे वाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जानाळा येथील र्कीर्ती रामदेवराव कुळमेथे हा नातेवाईकाबरोबर चिरोली बिटातंर्गत येत असलेल्या शेतशिवारात गेले होता. शेतीशिवाराला लागूनच जंगलाचा परिसर असल्याने त्या ठिकाणी टपून बसलेल्या वाघाने कीर्तीवर झडप घातली. सोबतच्या इसमाने कीर्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, चवताळलेल्या वाघापुढे त्याचा टिकाव लागला नाही. घाबरलेल्या नातेवाईकाने तिथून पळून जाऊन फोनवर जानाळा येथील गावकऱ्यांना माहिती दिली. पुढील तपास चिरोली बिटातील वनाधिकारी करीत आहेत.

हेही वाचा: Success Story : तिखट मिरचीने केला ६० जणांचा संसार गोड; कोरोना काळातही बारमाही काम

जखमी महिलेचाही मृत्यू

दोन दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जानाळा येथील वनिता वसंत गेडाम या महिलेचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. ही महिला तेंदूपत्ता तोडाईसाठी चार पाच महिलांबरोबर जानाळा तलावाच्या परिसरात गेली होती. तेंदूपत्ता संकलन करीत असताना वनितावर वाघाने हल्ला चढविला होता.

(Leopard dies of poisoning in Gondia district)

Web Title: Leopard Dies Of Poisoning In Gondia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Chandrapur
go to top