Success Story : तिखट मिरचीने केला ६० जणांचा संसार गोड; कोरोना काळातही बारमाही काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Success Story : तिखट मिरचीने केला ६० जणांचा संसार गोड; कोरोना काळातही बारमाही काम

Success Story : तिखट मिरचीने केला ६० जणांचा संसार गोड; कोरोना काळातही बारमाही काम

पचखेडी (जि. नागपूर) : शेती (Agriculture) हा तोट्याचा व्यवसाय आहे असे म्हणतात. म्हणून आजचे तरुण शेती व्यवसायाकडे वळायला धजावत नाही. तसेही शेती म्हणजे परिश्रम अधिक आणि फळ कमी अशी समज झाली आहे. अवकाळी पाऊस, उन्ह, वादळी वार, अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान (Loss of farmer) होते. तरीही शेतकरी घाबरून न जाता पीक घेत असतात. काळ्या मातीत धाम गाळून धान्य पिकवीत असतात. असाच एक शेतकरी पजखेडी तालुक्यात आहे. त्यांनी शेती करून एक-दोन नव्हे तर तब्बल ६० कुटुंबाचा संसार गोड केला आहे. (The life of 60 people is sweetened with red chillies)

पचखेडी येथील मोरेश्वर बाळबुदे यांनी तब्बल २२ एकरांत मिरचीचे उत्पादन घेतले. पीक घेण्याची नियोजन पद्धती व ठिबक सिंचनाने त्यांना मिरचीचे विक्रमी उत्पादन झाले. त्यांचे सरासरी उत्पादन ४० लाख रुपये इतके आहे. मिरची उत्पादनातून ‘कृषिश्रीमंती’च त्यांच्या दारी आली नाही तर परिसरातील तब्बल ६० मजुरांचा संसारही गोड होण्यास त्यांनी हातभार लावला.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेपेक्षा मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या; वाचा काय सांगतात डॉ. गावंडे

बाळबुदे यांच्या शेतात सद्या मिरची पिकाचा तोडा सुरू आहे. त्यांनी अत्यंत मेहनतीने २२ एकर शेतीला कृषिसमृद्ध केले. जमिनीची योग्य मशागत, शासकीय योजनेतून व स्वखर्चाने पीक पद्धतीचे गणित बसविले. जमिनीच्या पाण्याचा स्रोत ओळखून ठिंबक सिंचन योजना कार्यान्वित केली. मिरची पिकाला प्राधान्य दिले.

या पिकासाठी त्यांना नियमित मजुरांची गरज भासते. आज त्यांच्या शेतात १० पुरुष व ५० महिलांना काम करीत आहेत. या मजुरांच्या मेहनतीमुळेच त्यांना ४० लाखांच्या मिरचीचे विक्रमी उत्पादन झाले. आता परत तितक्याच रुपयांचे पीक होईल, असे बाळबुदे सांगतात. शेतीचे नियोजन व पिकांचे संगोपन केल्यास शेतकरी हा कारखानदारांपेक्षा अजिबात कमी नाही. मात्र, त्यासाठी शासनाने शेतमालाला खर्चाच्या दुप्पट भाव दिला पाहिजे. कारण, कारखानदार हा शेतमालाचा भाव ठरवतो. त्यामुळे त्याला नुकसान कमी होते. याउलट, शेतकऱ्यांचे आहे. यानिमित्ताने का होईना आपण मजुरांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न सोडवितो.सावधान! सोशल मीडियावर लहान मुलांचे 'हे' फोटो चुकूनही करू नका शेअर; अन्यथा...

हेही वाचा: सावधान! सोशल मीडियावर लहान मुलांचे 'हे' फोटो चुकूनही करू नका शेअर; अन्यथा...

मजुरांच्या हाताला बारमाही काम

कोरोनामुळे अनेकांचे हाल होत आहे. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हाताला काम नसल्याने अनेकजण आत्महत्येचा पर्याय निवडत आहे. मात्र, बाळबुदे यांच्या शेतात मजुरांच्या हाताला बारमाही काम मिळत आहे. यामुळे शेतकरी बाळबुदे यांचे आभार तर मानतातच शिवाय मेहनतीचे चीज होतेय म्हणून समाधानही व्यक्त करीत आहे.

वर्षभर शेतात राबतो. मिरचीची तोडाई झाली की मिरचीचे झाडे उपटणे, शेतीची मशागत, लागवड, निंदणं, खुरपणं, असे वर्षभर आम्हाला काम मिळते. कामासाठी इतरत्र धावपळ करण्याची गरज नाही.
- शांताबाई चापले, महिला मजूर, वेलतूर

(The life of 60 people is sweetened with red chillies)

Web Title: The Life Of 60 People Is Sweetened With Red

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurFarmer
go to top