Morshi News : मोर्शी तालुक्यातील सिंभोरा शेतशिवारी बिबट्याने शेतकऱ्याच्या दोन वर्षांच्या वगारीवर हल्ला करून त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.
मोर्शी : मोर्शीपासून जवळ असलेल्या सिंभोरा येथील शेत शिवारातील एका शेतामध्ये बांधलेल्या वगारीचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना गुरुवारी (ता.५) रात्री घडली.