esakal | वडाळीत बिबट्याचा धुमाकूळ; एक गाय ठार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वडाळीत बिबट्याचा धुमाकूळ; एक गाय ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरालगत असलेल्या वडाळी वनपरिक्षेत्रातील चांदूररेल्वे ते पोहरा मार्गावर चार बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यात एका गाईचा मृत्यू झाला, तर अन्य दोन गाई गंभीर जखमी आहेत. शनिवारी (ता. 24) सकाळी ही घटना उघडकीस आली.
मागील 15 दिवसांत बिबट्याने हल्ला करून जनावरांना ठार केल्याची ही दुसरी घटना आहे. वडाळी वनपरिक्षेत्रात चांदूररेल्वे ते पोहरा मार्गावर वैष्णोदेवी मंदिर आणि हिलटॉप कॉलनी असून, त्या ठिकाणी काहींची घरे आणि जनावरांचा गोठा आहे. शुक्रवारी (ता. 23) रात्री या ठिकाणी जनावरांच्या गोठ्यावर चार बिबट्यांनी हल्ला केला. परिसरात बिबट, पट्टेदार वाघांसह इतर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. बिबट्याने हल्ला केल्याने दुसरी गाय जखमी स्थितीत तेथून पळाल्याने बचावल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. ज्यावेळी बिबट्याने जनावरांच्या गोठ्यावर हल्ला केला तेव्हा आवाज ऐकू आल्याने काहींनी खिडक्‍यांमधून बिबट्यांना बघितल्याची माहिती दिली. वनविभागाच्या वतीने या परिसरात बिबट्यांचे अस्तित्व असल्यामुळे येथे ट्रॅप कॅमेरेसुद्धा बसविण्यात आले. 15 दिवसांपूर्वी राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) परिसरातसुद्धा बिबट्याने हल्ला करून बकऱ्या आणि कुत्र्यांना लक्ष्य केले होते.

loading image
go to top