विदर्भातील या प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पाकडे विदेशी पर्यटकांची पाठ, अनेक बुकिंग रद्द

नाहीद सिद्दीकी
शनिवार, 14 मार्च 2020

मोहर्ली (जि. चंद्रपूर) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जगभरात पट्टेदार वाघांच्या अधिवासाठी प्रसिद्ध आहे. ऑक्‍टोबर महिन्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंत या प्रकल्पात हजारो पर्यटकांची ये-जा असते. यातील 30 ते 40 टक्‍के पर्यटक हे परदेशी असतात. यंदा जगभर कोरोना आजाराच्या संसर्गामुळे विविध देशांनी आपल्या नागरिकांना परदेशी दौरा न करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ऐन हंगामाच्या काळात सुमारे 60 ते 70 टक्‍के परदेशी पर्यटकांनी ताडोबाकडे पाठ फिरवल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

जानेवारी ते जूनपर्यंतचा काळ हा ताडोबा पर्यटनाचा सुगीचा काळ मानला जातो. या काळात नेमके व्याघ्रदर्शन होते. पण यावेळी कोरोना आजाराचा संसर्ग जगात झाल्याने विदेशी पर्यटकांच्या पर्यटनावर मर्यादा आल्या. ताडोबाला येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या बुकिंग रद्द करण्यात आल्या आहेत. विदेशी पर्यटक ज्या रिसॉर्टमध्ये वास्तव्यास येतात, त्याच रिसॉर्ट मालकांनी हे वास्तव समोर आणले. त्यामुळे ताडोबाला कोरोनाचा फटका बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वीस द्वारांच्या माध्यमातून 100 जिप्सी एकावेळेस व्याघ्र दर्शनासाठी प्रकल्पात दाखल होतात. सुमारे दोन हजार नागरिकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून थेट रोजगार मिळत असतो. याशिवाय अवलंबितांची संख्या हजारोंच्या घरात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील परदेशी पर्यटकांची बुकिंग रद्द झाल्यामुळे याचा फटका इथल्या पर्यटन व्यवसायाला बसणार आहे.

बोंबला! नागपूरच्या मेयो रुग्णालयातून चार कोरोना संशयितांचा पोबारा

चालक, जिप्सी मालक, रिसॉर्ट मालक, होम स्टे चालक, गाइड, छोटी हॉटेल्स यावर याचा जबर परिणाम होणार आहे. पण विदेशी पर्यटकांनी पाठ फिरवल्याच्या वृत्ताला ताडोबा व्यवस्थापनाकडून दुजोरा मिळू शकला नाही. ताडोबाची बुकिंग ऑनलाइन होत असल्याने, यावर बुकिंग रद्द केल्याच्या कोणत्याही नोंदी नाहीत. त्यामुळे विदेशी पर्यटकांनी पाठ फिरवली, हे आम्ही सांगू शकत नाही, असे ताडोबा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी जनजागृती रूपात शासनाने मार्गदर्शन करण्याचं आवाहन रिसॉर्ट मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: less responce from foreign tourist to tiger safari