
वणी (जि. यवतमाळ) : अकस्मात आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे वणी तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला शेती करणे गरजेचे आहे. कारण वणी तालुका हा 70 टक्के शेतकरीवर्गाने व्यापलेला आहे. संपूर्ण तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या मशागतीला लगबगीने लागले आहेत. आता 15 दिवसांवर नक्षत्राची सुरुवात होत असल्याने शेतकरी बि-बियाणे घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी वणी तालुका कृषी विभागाने एक लाख 13 हजार बियाण्यांच्या पिशव्यांची मागणी केली असताना शासनाकडून केवळ 34 टक्के बियाणे प्राप्त झाली आहे. यावेळी पावसाळा लवकर असल्याचा अंदाज असल्याने शेतकरी लगबगीने शेतीच्या मशागतीला लागला आहे. कमी-अधिक प्रमाणात काही शेतकऱ्यांच्या जमिनी तयार होण्याच्या मार्गावर असून पहिल्या पावसाची वाट बघत आहे. त्यानंतर शेतकरी आपला मोर्चा बियाणे खरेदीकडे वळविणार आहेत. परंतु वणी तालुक्यात आज रोजी 140 कृषी केंद्र आहेत व सरकारकडे 34 टक्के बियाणे.
कृषी विभागाची मागणी पाच हजार 711.97 क्विंटलची आहे. आज रोजी बियाण्यांचा अल्पसाठा असल्याने शेतकऱ्यांची बियाण्यांची उर्वरित व्यवस्था कशी होईल, 35 हजार शेतकरी बियाणे कोठून घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय बियाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना काळ्या बाजाराला तर बळी पडावे लागणार नाही ना, असाही प्रश्न शेतकऱ्यांमोर निर्माण झाला आहे.
यावर्षी कृषी विभागाने पाच हजार 711.97 क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. यामध्ये सोयाबिन चार हजार 661.00 क्विंटल बियाणे, तूर 547.00 क्विंटल बियाणे, मूग 3.75 क्विंटल बियाणे, ज्वारी 10.00 क्विंटल बियाणे, कापूस बियाणे 490.22 क्विंटल असे एकूण पाच हजार 711.97 क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. परंतु सरकारजवळ बियाण्यांचा अल्पसाठा असल्याने शेतकऱ्यांना काळ्या बाजाराला बळी पडावे लागणार तर नाही ना, असाही प्रश्न निर्माण होणे सहाजिक आहे.
फसवणूक टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक
आधीच बियाण्यांच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त असताना सर्वत्र कोरोनाची महामारी आहेच. या महामारीत बियाण्यांची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही ना, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तेव्हा यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 64 हजार 30 आहे. यासाठी पाच हजार 711.97 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. तेव्हा शासनाने शेतकऱ्यांची गरज पूर्ण करावी, जेणेकरून शेतकऱ्याला काळ्या बाजाराला बळी पडावे लागणार नाही व कृषी विभागाने कृषी केंद्रावर नजर ठेवून शेतकऱ्यांची फसगत होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, यासाठी कृषी विभागाने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय शेतकऱ्यांनीसुद्धा सतर्क राहणे गरजेचे आहे. सतर्कतेनेच फसवणूक टळू शकेल. त्यामुळे कृषी विभाग आणि शेतकऱ्यांनी यासाठी सतर्क राहून सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.