Amravati : उदासीनता सोडा, पुढाकार घ्या ; ॲड. प्रकाश आंबेडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अॅड. प्रकाश आंबेडकर  

उदासीनता सोडा, पुढाकार घ्या ; ॲड. प्रकाश आंबेडकर

चांदूररेल्वे : एकेकाळी खाऊन-पिऊन सुखी असणारा विदर्भ आज दुःखी आहे. शेतकरी कितीही राबला तरी उपाशीच राहतो. विदर्भात सारेकाही आहे; परंतु त्याचा लाभ पश्चिम महाराष्ट्राला होतो. शासनाकडून जेव्हा काही दिले जाते तेव्हा भूमिपुत्र मागे राहतो. या सर्व परिस्थितीला शासनासोबतच भूमिपुत्रांची उदासीनताही कारणीभूत आहे. वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नसल्याचेही ठाम मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडीतर्फे युवा प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांच्यातर्फे आयोजित संत्रा परिषदेचे स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले. अध्यक्षीय भाषणाच्या वेळी अॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे काम भूमिपुत्रांनी करावे तेव्हाच ह्या मानसिकतेत बदल होऊन ही संत्रा परिषद यशस्वी होईल, असे मत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी मांडले.

संत्राच नव्हे तर मतदारसंघातील सर्वच शेतकऱ्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी ही संत्रा परिषद असल्याचे विश्वकर्मा यांनी प्रस्तविकात सांगितले. मंचावर प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, माजी कृषी आयुक्त डॉ. सी. डी. मायी दिल्ली, पंजाब येथील डॉ. गुर्जीनदर सिंग, निशा शेंडे, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेशा उपाध्यक्ष अरुंधती शिरसाट, कृषी महाविद्यालय नागपूर येथील डॉ. डी. एम. पंचभाई, डॉ. आर. पी. गजभिये, डॉ. विलास तांबे, डॉ. मोहन पाटील, महाराष्ट्र संत्रा बागायतदार संघाचे अध्यक्ष धनंजय तोटे यांच्यासह अनेक कृषी संत्रातज्ज्ञ उपस्थित होते.

चांदूररेल्वे तालुक्यात नर्सरी

आजच्या संत्रा परिषदेच्या निमित्ताने पंजाबराव कृषी विद्यापीठाने चांदूररेल्वे तालुक्यात एक अद्यावत नर्सरी देण्याचे जाहीर केले. हे आजच्या संत्रा परिषदेचे यश असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्याचा लाभ तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचेही मार्गदर्शकांनी सांगितले.

loading image
go to top