esakal | चला, शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास करूया; शेतकरी आंदोलनाचे नेते अमर हबीब यांचं आवाहन 
sakal

बोलून बातमी शोधा

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612779740339,"A":[{"A?":"I","A":54.00000000000001,"B":728.3493249291006,"D":177.65067507089944,"C":54.587207430876376,"a":{"B":{"A":{"A":"MAEQYimpthc","B":1},"

अन्न हा जगण्याचा मूळ आधार आहे. अन्न निर्माण करता आले, म्हणून माणूस प्रगती करू शकला. शेतकरी अन्न पिकवतो. तो सर्जक आहे. त्याची आत्महत्या ही गंभीर बाब आहे. खरे तर शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती मानली पाहिजे.

चला, शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास करूया; शेतकरी आंदोलनाचे नेते अमर हबीब यांचं आवाहन 

sakal_logo
By
विनोद कोपरकर

महागाव, (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील चिलगव्हाण येथे 19 मार्च 1986 रोजी सधन शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी व चार मुलांसह आत्महत्या केली होती. देशातील ही पहिली शेतकरी कुटुंबाची सामूहिक आत्महत्या मानली जाते. 2017 पासून महाराष्ट्रातीलच नव्हे, देश-विदेशातील लाखो सहृदयी लोक दरवर्षी 19 मार्चला उपवास करतात. यावर्षीही शेतकऱ्यांसाठी सहवेदना म्हणून एक दिवसाचा उपवास करू या, असे आवाहन किसान आंदोलनचे नेते अमर हबीब यांनी केले आहे.

अन्न हा जगण्याचा मूळ आधार आहे. अन्न निर्माण करता आले, म्हणून माणूस प्रगती करू शकला. शेतकरी अन्न पिकवतो. तो सर्जक आहे. त्याची आत्महत्या ही गंभीर बाब आहे. खरे तर शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती मानली पाहिजे. दुर्दैवाने, या गंभीर बाबीकडे कोणाचे फारसे लक्ष नाही. शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, या साठी मी काय करू शकतो? याचे चिंतन करणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - वनविभागाने कारवाई केली अन् अनेक कुटुंब रस्त्यावर आली, वनात केले होते अतिक्रमण

आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात सत्ता नाही. शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे रद्द करण्याचा अधिकार नाही. आपण शस्त्रे घेऊन लढू शकत नाही. करोडो शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याएवढी पुंजीही आपल्या जवळ नाही. आपण सामान्य माणसे फक्त सहवेदना व्यक्त करू शकतो. शेतकऱ्यांना 'आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' हा दिलासा तर देऊ शकतो. तो दिलासा देण्यासाठी 19 मार्च रोजी एक दिवसाचा उपवास ठेवायचा आहे. आत्मक्‍लेशाचा हा मार्ग या देशात अनेकदा वापरला गेला आहे. त्यातून अपेक्षित परिणाम आले आहेत. तोच प्रयत्न आपण करायचा आहे.

हा उपवास उत्स्फूर्तपणे, आपल्या मनाशी निर्धार करून करायचा आहे. आपण आपले नित्याचे काम करीत उपवास करू शकतो. खूप केले देवा-नवसाचे उपवास, आता एक उपवास शेतकऱ्यांसाठी! याला आपण वैयक्तिक उपवास म्हणू. सार्वजनिक ठिकाणी बसणे, म्हणजे उपोषण करणे, तुम्हाला जे सोयीचे वाटेल त्या पद्धतीने उपवास किंवा उपोषण करू शकता.

पदयात्रा

डॉ. राजीव बसरगेकर 11 मार्चला औंढा नागनाथ येथे महादेवाला साकडे घालून पदयात्रा सुरू करीत आहे. ते 19 मार्चला चिलगव्हाणला पोचतील. त्यांच्यासोबत पदयात्रा करायला अनेक जण तयार झाले आहेत. तुम्हाला शक्‍य असेल तर या पदयात्रेत तुम्हीही सहभागी होऊ शकता. पूर्ण यात्रेत वेळ देणे शक्‍य नसेल तर 19 मार्चला महागाव येथे या. तेथून 8 किलोमीटर चालत चिलगव्हाणला जाता येईल. 

पदयात्रेचा मार्ग

औंढा नागनाथ ते चिलगव्हाण अशा सुमारे सव्वाशे कि.मी.च्या पदयात्रेचा मार्ग पुढीलप्रमाणे ठरविण्यात आला आहे. 

11 मार्च : औंढा नागनाथ- येहळेगाव- डिग्रस- कऱ्हाडे.
12 मार्च : डिग्रस- कऱ्हाडे- हिंगोली- खानापूर चिं.
13 मार्च : खानापूर चिं.- कळमनुरी- माळेगाव.
14 मार्च : माळेगाव- बाभळी- शेंबाळ पिंपरी.
15 मार्च : शेंबाळ पिंपरी- मुळावा- पळशी.
16 मार्च : पळशी-मरसुळ- उमरखेड- सुकळी.
17 मार्च : सुकळी- नांदगव्हाण- बिजोरा.
18 मार्च : बिजोरा- मुडाना- महागाव.
19 मार्च : महागाव ते चिलगव्हाण.

हेही वाचा मामा-भाचाच्या वयात फक्त चार वर्षांचा फरक; मित्रांसारखे राहत असताना विसरले नात्याचा...

सामूहिक श्रद्धांजली

चिलगव्हाण येथे सकाळपासूनच वर्दळ राहील. अकरा वाजता सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज यांचे कीर्तन होईल. त्यानंतर अनेक मान्यवर आपल्या भावना व्यक्त करतील. दुपारी 3 वाजता शोकसभा सुरू होईल. आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता होईल. 

loading image
go to top