चिखलदरा/धामणगावरेल्वे - तालुक्यातील कुही गावामध्ये सोमवारी (ता. पाच) सायंकाळी साडेचार ते पाच वाजेदरम्यान वीज पडून एका शेतकऱ्याचा, तर धामणगावरेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव जवळच्या शेतशिवारात एका ७२ वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. कुही येथील चुन्नी गोटू सावरकर (वय ४२) व जुना धामणगाव येथील विनायक शेषराव बोरकर, असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.