वीज गेल्याने रक्तचाचण्या खोळंबल्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

नागपूर :  मेडिकलचा बाह्यरुग्ण विभाग. सकाळी दहाची वेळ. रुग्णांची तोबा गर्दी असतानाच येथील वीजपुरवठा खंडित झाला. याचा फटका उपचारासाठी आलेल्या हजारो गरीब रुग्णांना बसला. मेडिकलमधील एक्‍सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफीची सर्व यंत्रणा बंद पडली. याशिवाय रुग्णांच्या रक्तचाचण्यापासून इतर सर्व चाचण्या खोळंबल्या. या घडमोडीत प्रशासनाची धावपळ झाली. वीजपुरवठा सुरू करण्यासाठी द्रविडी प्राणायाम करण्याची वेळ प्रशासनावर आली असतानाही अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी अंधारात कॉलेज कौन्सिल घेत मेडिकलमधील प्रश्‍नांवर चर्चा केली. पाणी समस्येचा फटका मेडिकलला सोसावा लागत नसल्याची चर्चा कौन्सिलमध्ये झाली.

महानगरपालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला. मेडिकलमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, मेडिकलमध्ये पाणी साठवण्यासाठी यंत्रणा आहे. पाण्यासाठी कोणत्याही शस्त्रक्रियांचा खोळंबा झाला नसल्याची विभागप्रमुखांनी माहिती सादर केली. मात्र, बुधवारी (ता.24) मेडिकलचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अतिदक्षता विभागासह अपघात विभागात, बाह्यरुग्ण विभागात, पॅथॉलॉजी, जीवरसायनशास्त्र, रेडिओलॉजीत अंधार पसरला होता. एक्‍स रे, सिटी स्कॅन उपकरण बंद पडल्याने रुग्णांच्या चाचण्या कराव्यात कशा, असा पेच प्रशासनासमोर उभा ठाकला. चार ते पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला.
सुपरची विद्युत यंत्रणा कोलमडली
बुधवारी मेडिकलप्रमाणेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही विद्युत यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, त्यात बराच वेळ निघून गेला. सुपरमध्ये बराच वेळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने येथील सर्वच विभागातील शस्त्रक्रिया खोळंबल्या. काही शस्त्रक्रिया रद्द झाल्या तर काही शस्त्रक्रिया वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lightning triggers blood tests