मोठी बातमी : दारू विक्रेत्याचा पोलिसांवर तलवारीने हल्ला 

शेख सत्तार
Tuesday, 21 July 2020

देवळी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या चिखली येथील धर्मा लोखंडे यांच्या शेतात वर्धेतील गुन्ह्यात आवश्‍यक व्यक्‍ती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे व शिपाई पवन झाडे हे दोघे या आरोपींच्या शोधात गेले होते. पोलिस येत असल्याचे दिसताच दीपक गावंडे याने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. 

देवळी (जि. वर्धा) : वर्धा येथील आरोपी चिखली येथील धर्मा लोंडे यांच्या शेतात असल्याची माहिती देवळी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिस दिसताच शेतातील झोपडीत असलेल्या आरोपींनी तलवारीने पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी हा हल्ला परतून लावत चार जणांना अटक केली. या चौघांजवळ असलेल्या दारूसाठ्यावरून ते दारूविक्रीकरिता येथे एकत्र आले असावे असा अंदाज पोलिसांचा आहे. 

धर्मा राज लोंडे (वय 25, रा. सिद्धार्थनगर, वर्धा), दीपक साहेबराव गावंडे (वय 28, रा. दिघी), अमोल भलचंद्र दिघीकर (वय 30, रा. दिघी) आणि कुणाल प्रदीप शेंडे (वय 21, रा. सिद्धार्थनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. चौघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सहा तलवार आणि दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - राजकीय समझोता?, माजी मुख्यमंत्र्यांचे गृहमंत्र्यांना पुन्हा पत्र; मानले आभार...

देवळी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या चिखली येथील धर्मा लोखंडे यांच्या शेतात वर्धेतील गुन्ह्यात आवश्‍यक व्यक्‍ती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे व शिपाई पवन झाडे हे दोघे या आरोपींच्या शोधात गेले होते. पोलिस येत असल्याचे दिसताच दीपक गावंडे याने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. 

पोलिसांनी हल्ला परतून लावला. यावेळी शिपाई पवन झाडे याने दीपक गावंडे याला पकडून ठेवले. दरम्यान इतर आरोपींनी पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि पवन झाडे या दोन्ही कर्मचाऱ्यांना धक्‍काबुक्‍की केली. असे असले तरी पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना ठाण्यात आणत गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार नितीन लेव्हरकर करीत आहेत. 

संपादन - नीलेश डाखोरे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Liquor dealer attacks police with sword