राजकीय समझोता?, माजी मुख्यमंत्र्यांचे गृहमंत्र्यांना पुन्हा पत्र; मानले आभार...

राजेश चरपे 
Tuesday, 21 July 2020

सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटोंमध्ये साहील सय्यद राष्ट्रवादीचा दुप्पटा घेऊन आंदोलन करीत आहे. यावरून तो कुठल्या पक्षाचा आहे हे स्पष्ट होते. असे लोक नेत्यांसोबत फोटो काढून आपला कार्यभाग साधतात. त्यामुळे त्याचा पक्ष कोणता या वादात आपण पडणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. 

नागपूर : हनी ट्रॅप ऑडिओ क्‍लिपची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्राद्वारेच साहील सय्यद हा भाजप नेत्यांचा व्यावसायिक भागीदार आहे. ही क्‍लिप भाजपच्याअंतर्गत राजकारणाचा भाग असल्याचे दिसून येते, असेही कळविले होते. यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा गृहमंत्र्यांना पत्र लिहून आभार मानले आहे. काय असावे कारण... 

हनी ट्रॅप ऑडिओ क्‍लिपमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. साहील सय्यदशी अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याने अनेकांच्या भुवया अंचावल्या आहेत. शहरात साहील सय्यदवरून वातावरण चांगलेच तापले असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात उडी घेत चौकशीची मागणी केली होती.

हेही वाचा - 'ऑडिओ क्‍लिप'बाबत गृहमंत्र्यांचे फडणवीस यांना पत्र, काय म्हणाले ते...

ऑडिओ क्‍लिपच्या निष्पक्ष चौकशीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले होते. पत्राला उत्तर देताना मृहमंत्र्यांनी साहील सय्यद हा भाजप नेत्यांचा व्यावसायिक भागीदार आहे. ही क्‍लिप भाजपच्याअंतर्गत राजकारणाचा भाग असल्याचे दिसून येते, असेही कळविले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पत्र पाठवून आपण या प्रकरणाची चौकशी करणार नसाल तर संबंधित क्‍लिप उच्च न्यायालयात सादर केली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती न्यायालयाला केली जाईल, असा इशारा दिला होता. 

सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटोंमध्ये साहील सय्यद राष्ट्रवादीचा दुप्पटा घेऊन आंदोलन करीत आहे. यावरून तो कुठल्या पक्षाचा आहे हे स्पष्ट होते. असे लोक नेत्यांसोबत फोटो काढून आपला कार्यभाग साधतात. त्यामुळे त्याचा पक्ष कोणता या वादात आपण पडणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.

महत्त्वाची बातमी - भिजवून ठेवलेला कणकीचा गोळा फ्रीजमध्ये ठेवताय, थांबा हे वाचाच मग...

सोशल मीडियावर रंगला फोटोवॉर

तत्पूर्वी, साहील सय्यद कुठल्या पक्षाचा यावरून कार्यकर्त्यांमार्फत सोशल मीडियावर फोटोवॉर रंगले होते. राष्ट्रवादीच्या गोटातून चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, सुधाकर देशमुख यांच्यासोबतचे फोटो टाकले जात होते. प्रत्युत्तरादाखल भाजप कार्यकर्त्यांमार्फत अजित पवार, अनिल देशमुख, शरद पवार यांच्यासोबतचे साहीलचे फोटो पोस्ट केले जात होते. 

राजकीय वाद थोडा शमला

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी आमदार सुधाकर देशमुख यांनी पुरावे सादर करा; अन्यथा माफी मागा, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापणार असे दिसून येत होते. रविवारी साहील सय्यदला अटक करण्यात आली. त्याची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. त्यामुळे राजकीय वाद थोडा शमला असल्याचे दिसून येते.

अधिक माहितीसाठी - बापरे... त्याने स्वत:च्या नाही, परंतु तिच्याही वयाचा विचार केला नाही

चांगलाच वाद होता रंगला

हनी ट्रॅप ऑडिओ क्‍लिपची चौकशी पोलिस सहआयुक्तांमार्फत केली जात आहे. यावर समाधान व्यक्त करून या घटनेचे गांभीर्य ओळखल्याबद्दल माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पत्राद्वारे आभार मानले आहे. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी फडणवीस आणि गृहमंत्र्यांमध्ये या प्रकरणावरून चांगलाच वाद रंगला होता. त्यांनी एकमेकांवर राजकारण करीत असल्याचा आरोपही केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी गांभीर्य दाखवून गृहमंत्र्यांचे आभार व्यक्त केल्याने "राजकीय समझोता' झाल्याचे बोलले जाते. 

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis wrote a letter to Anil Deshmukh and thanked him