esakal | सहा वर्षांनी उघडले मदिरालयाचे द्वार; मद्यपी, दारूविक्रेत्यांत आनंद
sakal

बोलून बातमी शोधा

सहा वर्षांनी उघडले मदिरालयाचे द्वार; मद्यपींमध्ये आनंद

सहा वर्षांनी उघडले मदिरालयाचे द्वार; मद्यपींमध्ये आनंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा मंत्रिमंडळात निर्णय झाला. राज्य सरकारने अध्यादेश काढून शिक्कामोर्तब केले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत हा निर्णय लांबणीवर जाऊ नये म्हणून राज्यातील तिन्ही खंडपीठात कॅव्हेट दाखल केले. अर्ज नूतनीकरणाची प्रक्रिया राबविली गेली. मात्र, प्रत्यक्षात विक्री कधी सुरू होते याकडे मद्यप्रेमींसह दारूविक्रेत्यांचे लक्ष लागले होते. सोमवारी (ता. ५)  चंद्रपूरकरांची प्रतीक्षा (Liquor store opened) संपली. पहिल्या टप्प्यात मंजुरी दिलेली ९८ दुकाने सुरू (98 shops open) झाली. तब्बल सहा वर्षांनंतर जिल्ह्यातील मदिरालयाचे द्वार उघडले गेले. त्यानंतर मद्यपींनी  दुकानांत मोठी गर्दी केल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळाले. (Liquor-store-opened-after-six-years-in-Chandrapur-Happiness-in-alcoholics-liquor dealers)

उत्पादन शुल्क विभागाने पहिल्या टप्प्यात  एक वाईन शॅाप, सहा बिअर शॉपी, ६५ बिअर बार आणि २६ देशी दारू दुकाने अशा ९८ दुकानांना परवानगी दिली. ही दुकाने कालपासून सुरू करण्यात आली. दुपारपासूनच मद्यप्रेमींनी  बारसमोर मोठी गर्दी केली. मात्र, दारूचा पुरवठा न झाल्याने अनेक दुकानदारांनी विक्री केली नाही. शहरातील सिद्धार्थ हॉटेल येथे दुपारपासून दारूविक्री करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणीसुद्धा मद्यपींनी  मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. काही ठिकाणी नागरिकांनीच दारूचे बॉक्स उचलण्यासाठी दुकानदारांना मदत केली.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

काही दिवसांपासून जिल्ह्यातील दारूची दुकाने सुरू होणार असल्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात ती कधीपासून होणार याबाबत उत्सुकता होती. सोमवारी दारूची दुकाने सुरू झाली. त्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा दुकानांकडे वळविला. मात्र, काही ठिकाणी स्टॅाक पोहोचला नव्हता. त्यामुळे तळीराम दुकानांसमोर वाट बघत उभे होते. शहरातील केवळ सिद्धार्थ बार सुरू झाले. येथे पार्सल सुविधा सुरू करण्यात आली. तेथे तळीरामांनी जात आपल्या घशाची तहान भागवली.

दारूविक्रीचे परवाने नूतनीकरण करण्यासाठी उत्पादन शुल्क कार्यालयाकडे तीनशे तीन अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील २८० अर्जांची चौकशी पूर्ण झाली आहे. १६८ प्रकरणे निर्णयासाठी आहेत. पहिल्या टप्प्यातील ९८ दुकानांना परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून दारूविक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- सागर धोंमकर, अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर

(Liquor-store-opened-after-six-years-in-Chandrapur-Happiness-in-alcoholics-liquor dealers)

loading image