esakal | १२ वर्षांचं प्रेम क्षणात संपलं, प्रियकराने गुपचूप लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide

१२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तब्बल १२ वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या प्रियकराने अचानक लग्न उरकून टाकले. त्यामुळे नैराश्‍यात गेलेल्या प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शनिवारी शांतीनगर पोलिस ठाण्याच्या (shantinagar police station nagpur) हद्दीत उघडकीस आली. पूजा (२९) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. (woman commit to suicide in nagpur)

हेही वाचा: बंडखोरी होण्याच्या भीतीने उमेदवारांची नावे गुलदस्त्यात, भाजपला धास्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा ही आई-वडील, तीन बहिणी आणि एक भावासह शांतीनगरात राहते. उच्चशिक्षित असलेल्या पूजाच्या घरात शैक्षणिक वातावरण होते. तिचे मोठी बहिण आणि भाऊ नामांकित कंपनीत नोकरी करतात. पूजाचे बीसीए पर्यंत शिक्षण झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून ती एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होती. तिचे क्लासेस सुरू होते. तिचा वर्गमित्र असलेला मुस्तफा याच्याशी तिची १२ वर्षांपूर्वी ओळख झाली. मैत्री झाल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पूजाने घरी आईवडील आणि बहिणींनी मुस्तफासोबत लग्न करणार असल्याचे सांगून टाकले. त्यामुळे ती २९ वर्षांची झाली तरी घरात कुणीही तिच्या लग्नाचा विषय काढला नव्हता. परंतु, दुसरीकडे मुस्तफा फक्त तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेत होता. मुस्तफा ही गरज लागेल तेव्हा तिला फिरायला नेत होता. त्यामुळे पूजालाही त्याच्यावर विश्‍वास होता. नेमकी पूजा तेथेच चुकली. मुस्तफाने तिच्या आंधळ्या प्रेमाचा गैरफायदा घेत तिला अंधारात ठेवले. तिला कधीही घरी न नेता लग्न करण्याचे फक्त आमिष दाखवत राहिला. दुसरीकडे पूजा एमपीएससीचे क्लास करून शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बघत होती. पूजाचे अभ्यासाकडे लक्ष असल्याचे बघून मुस्तफाने लगेच आईवडिलांना सांगून नातेवाईक असलेल्या मुलीशी साक्षगंध उरकले. याबाबत पूजाला काडीचीही कल्पना नव्हती. साक्षगंधानंतरही पूजाला तो फिरायला नेत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने गुपचूप लग्न उरकून टाकले.

मुस्तफाने केला विश्वासघात

तब्बल एक तपापासून डोळे झाकून मुस्तफावर विश्‍वास ठेवला. परंतु त्याने एका झटक्यात लग्न उरकून टाकत विश्‍वासघात केला. त्याने केलेल्या कृत्यामुळे मी नैराश्‍यात गेली होती. त्यामुळे त्याला माफ करू शकत नाही. मुस्तफाने दिलेले दुःख सहन न झाल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करून जीवनाचा अंत केला.

loading image
go to top