पहिल्या पाच सक्षम महिलांमध्ये महाराष्ट्रातील या खासदाराचे नाव...वाचा

गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

नवनीत राणा बडनेरा मतदारसंघाचे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी व अमरावतीच्या खासदार आहेत. नवनीत राणा सुरुवातीच्या काळात चित्रपटसृष्टीत सक्रिय होत्या. तेथे त्यांनी आपल्या कामाने प्रसिद्धी मिळवली. आता त्या राजकारणात सक्रिय असून संसदेत अमरावती लोकसभा मतदारसंघाते प्रतिनिधित्व करतात.

अमरावती : फेम इंडिया मॅगझिन व एशिया पोस्ट सर्वेने भारतातील २५ सशक्त महिलांची यादी जाहीर केली आहे. समाजसेवा, क्रीडा, पत्रकारिता, राजकारण, कला, संस्कृती, धर्म, महिला सक्षमीकरण, नोकरशाह या क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणा-या महिलांची या सर्वेच्या माध्यमाने निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील एकमेव महिलेचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचे नाव आहे नवनीत राणा. 

नवनीत राणा बडनेरा मतदारसंघाचे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी व अमरावतीच्या खासदार आहेत. नवनीत राणा सुरुवातीच्या काळात चित्रपटसृष्टीत सक्रिय होत्या. तेथे त्यांनी आपल्या कामाने प्रसिद्धी मिळवली. आता त्या राजकारणात सक्रिय असून संसदेत अमरावती लोकसभा मतदारसंघाते प्रतिनिधित्व करतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त, संसद मध्ये त्यांना भारतरत्न मिळावा यासाठी मागणी केली व क्रांतिज्योती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा त्या शाळेचे नूतनीकरण करून त्याच राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी मागणी केली.

A post shared by Navneet Kaur Rana (@navneetravirana) on

आपल्या कार्याची छाप सोडणा-या नवनीत कौर-राणा यांची देशाच्या २५ सक्षम महिलांपैकी पहिल्या पाचमध्ये नोंद झाली आहे. फेम इंडिया-एशिया पोस्ट सर्वेमध्ये त्यांची नोंद झाल्याने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. फेम इंडिया मॅगझिन व एशिया पोस्ट सव्र्हेने २५ सशक्त महिलांची यादी जाहीर केली आहे. त्यात नवनीत राणा यांच्या नावाचा समावेश झाला असल्याने त्यांच्या चाहत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वनवे वाहतूक ठरली जीवघेणी; अपघातात दोघे ठार, कारचा चुराडा

पहिल्या पाच सक्षम महिलांमध्ये भानूमती नरसिंहन, पी. व्ही. सिंधू, रूपा झा, तृनमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा व नवनीत राणा यांचा समावेश करण्यात आला आहे.

आजवर इमानेइतबारे लोकांची कामे केली. या सन्मानाने जबाबदारी अधिकच वाढविली आहे. खासदार होऊन फार कालावधी झालेला नाही, आणखी खूप काम करायचे आहे. अमरावतीकरांनी जो विश्वास आपल्यावर टाकला तो सार्थकी ठरविण्याचा निश्चितच प्रयत्न करेन.
- नवनीत राणा, खासदार, अमरावती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: list of 25 empowered women in india