न विचारता केले कर्जाचे पुनर्गठन!

farmer (1).jpg
farmer (1).jpg

अकोला : कर्जमुक्ती योजनेंतर्गत विविध सहकारी संस्था व महान येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली, न विचारता कर्जाचे पुनर्गठन केले. त्यामुळे कर्जमुक्तीची रक्कम कमी आली, अशी तक्रार नुकत्याच झालेल्या जिल्हा स्तरीय बैठकीत प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आले असून, जिल्हा उपनिबंधकांनी याबाबतचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीची घोषणा केली. त्यानुसार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची निर्मिती करण्यात आली. योजेनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील पात्रता याद्या जाहीर करुन संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम सुद्धा जमा करण्यात येत आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. 6 मार्च 2020 रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. र.न.432 व बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महान शाखेचे व्यवस्थापक यांनी कर्जमाफी योजनेमध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याची तक्रार नमुद करण्यात आली. शिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महान शाखे अंतर्गत असलेल्या सेवा सोसायटीतील शेतकऱ्यांना न विचारता कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असून, त्यामुळे कर्जमुक्तीची रक्कम कमी आल्याचे तक्रार निवेदन सुद्धा बार्शीटाकळी तालुक्यातील साल्पी येथील शेतकऱ्यांनी दिले आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली असून, समितीद्वारे प्राप्त अहवालानुसार कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे यांनी कळविले आहे.

गठीत समिती
बार्शीटाकळी सहकारी संस्थेचे सहायक निबंधक श्री पोहरे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा विशेष लेखापरिक्षक श्री सोळंके, जिल्हा मध्यवर्ती सह.बँक अकोल्याचे निरिक्षक एस.आर. गावंडे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, समिती चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांना सादर करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com