
अमरावती : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा येत्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी न केल्यास ती बच्चू कडू यांची नाही तर शेतकऱ्यांची फसवणूक असेल. त्याचे परिणाम त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशारा ‘प्रहार’ संघटनेचे प्रमुख माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.