
वन्यप्रेमींची रॅली कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही या मुद्यावर आंदोलक अडून बसले होते. गेडाम यांनी परिस्थिती हाताळत अमरावतीवरून आलेल्या वन्यप्रेमींना स्थानिक लोकांच्या विरोधाची जाणीव करून देत परत जाण्यास सांगितले.
महेंद्री अभयारण्याला स्थानिकांचा विरोध; वन्यजीव प्रेमींविरुद्ध केला ‘चक्काजाम’
शेंदुरजनाघाट (जि. अमरावती) ः प्रस्तावित महेंद्री वन्यजीव अभयारण्याच्या समर्थनार्थ अमरावतीवरून आलेल्या वन्यजीव प्रेमींची बाईकरॅली महेंद्री अभयारण्यविरोधी शेतकरी, शेतमजूर व आदिवासी कृती समितीच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकांनी परतवून लावली. या निषेध रॅलीत तरुण मुले, महिला आणि मोठ्या संख्येने पुरुष सहभागी झाले होते.
पंढरी येथील सरपंच जानराव उईके व अभयारण्यविरोधी कृती समितीचे अध्यक्ष झटामझिरी येथील प्रा. कमलनारायण उईके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी, वन्यप्रेमींची रॅली वरुडला पोहोचलेली असताना शेंदूरजनाघाट येथील पोलिस निरीक्षक गेडाम आंदोलनस्थळी हजर झाले. त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखून ठेवण्यासाठी लोकांना आवाहन केले. कायदा हातात न घेण्याचे देखील त्यांनी सांगितले.
कडाक्याच्या थंडीत वाढली हुरड्याची रंगत; चुलीवरच्या जेवणासाठी गावाकडे धूम
वन्यप्रेमींची रॅली कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही या मुद्यावर आंदोलक अडून बसले होते. गेडाम यांनी परिस्थिती हाताळत अमरावतीवरून आलेल्या वन्यप्रेमींना स्थानिक लोकांच्या विरोधाची जाणीव करून देत परत जाण्यास सांगितले. त्यामुळे अभयारण्य विरोधातील आंदोलकांनी विरोधाच्या घोषणा देत कार्यक्रमाची सांगता केली.
`जैतादेही` पॅटर्नमुळे खुलणार शालेय सौंदर्य; नरेगामार्फत होणार शाळेचा भौतिक विकास
या आंदोलनाला झटामझिरी, भेमडी, रवाळा, वाई, सातनुर, एकलविहीर, उराड, पंढरी, महेंद्री, कारली, जामगाव, पिपलागड, करवार, लिंगा आणि शेंदूरजनाघाट येथून ग्रामस्थ आले होते. आंदोलनात मनोज पंधरे, मुकेश धुर्वे, शंकर सिरसाम, दिवाकर सिरसाम, भास्कर गणोरकर, दिलीप गणोरकर, संदीप गोरडे, प्रवीण तरार, गजानन सलामे, मुकेश कोडापे, दिनेश नवडेक, सौरभ नागले, अजय इडपची, मधुकर उईके, चंद्रशेखर उईके, जयदेव खतरकर, दर्वेश कंगाले, पंकज सर्याम, संदीप वरठी, गोपाल धुर्वे, देवराव आहाके, भिमराव धुर्वे व इतर शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
संपादन ः राजेंद्र मारोटकर